top of page

भुजबळांनी न घाबरता जेलमध्ये जावं, अन् शहिद व्हावं, आम्ही त्यांचे महापुरुषांप्रमाणे पुतळे उभारू - माजी खासदार राठोड यांच वादग्रस्त वक्तव्य

ree

नांदेड: छगन भुजबळांना आरक्षणातील काहीच कळत नाही. भुजबळ यांना फॉर्म्युला देखील माहिती नाही. त्यांच्या चुकीमुळेच ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात आलं आहे. असा दावा माजी खासदार राठोड यांनी केला आहे.


आरक्षण मुद्यावरून माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मराठा- कुणबी एकच असल्याचं दाखवून त्यांना वेगळं आरक्षण द्यायला हवं होतं. मात्र मंत्री भुजबळ यांच्या चुकीमुळेचओबीसींचं आरक्षण धोक्यात आलं आहे. सरकारने काढलेल्या नव्या जीआरमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का बसला आहे. भुजबळ हे मंत्रिमंडळात आहेत. पण त्यांनी आता घाबरून न जाता राजीनामा द्यावा आणि जेलमध्ये जाऊन ते शहीद झाले पाहिजे, आम्ही त्यांचा पुतळा उभारू, इतर महापुरुषांपर्यंत त्यांचे फोटो लावू , असं हरिभाऊ राठोड यांनी म्हटलं आहे. नांदेडमध्ये बंजारा समाजाच्या वतीने एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना हरिभाऊ राठोड यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं. त्याचबरोबर मराठा आरक्षण जीआरमुळे मुख्यमंत्र्याची खुर्ची धोक्यात असल्याचंही यावेळी राठोड म्हणाले.


हरिभाऊ राठोड पुढे बोलताना म्हणाले की, “ ओबीसीच्या यादीत 425 जातींचा समावेश आहे. यापैकी फक्त कुणबी ही एक जात म्हणत आहे की शासनाने काढलेला जीआर बरोबर आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मराठा समाज कुणबी प्रमाणपत्र वापरून ओबीसी म्हणून फॉर्म भरतील, आम्ही काहीही करू शकणार नाही. आरक्षणामुळे बंजारा समाजाचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सरपंच आणि सदस्य होणार नाही. ‘छगन भुजबळ यांना आरक्षणाचं काहीच कळत नाही. त्यांना फॉर्म्युला देखील माहित नाही. त्यांच्या चुकीमुळे ओबीसीचं आरक्षण धोक्यात आलं आहे. तेव्हा त्यांनी ताबडतोब आपल्या पदाचा राजीनामा देऊन न घाबरता जेलमध्ये जायला पाहिजे आणि शहिद झाले पाहिजे’ असंही राठोड म्हणाले.

Comments


bottom of page