top of page

भोंदूबाबा खरातच्या बंल्याची रात्रभर झाडाझडती; 200 कोटींवर संपत्ती जमवली?

नाशिक : स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात याच्याविरोधातील कारवाईला आता वेग आला असून त्याच्या मालमत्तांची झाडाझडती सुरू करण्यात आली आहे. महिलेच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या संपत्तीचा तपास सुरू केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षात अशोक खरात याने कोट्यावधी रुपयांची मालमत्ता जमा केली आहे. नाशिक शहरात त्याचा अलिशान बंगला आणि कार्यालय असून पाथर्डी परिसरात 30 एकर जमीन, सिन्नर, ओझर विमानतळ परिसर तसेच शिर्डी येथेही त्याची मोठ्या प्रमाणात जमीन असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. एकूणच जवळपास 200 कोटी रुपयांची संपत्ती त्याने उभी केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


दरम्यान, पोलिसांनी सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील त्याच्या फार्महाऊसवर रात्री उशिरा छापा टाकत सखोल तपासणी केली. याच भागातील इशान्येश्वर मंदिर आणि कुटीयामध्येही पोलिसांनी पाहणी केली आहे. या फार्महाऊसकर अनेक राजकीय नेते आणि कलाकारांची ये-जा असायची अशी देखील माहिती समोर येत आहे. या प्रकरणात अशोक खरात सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर महिलेच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप आहेत. या पार्श्वभूमीवर त्याच्या आर्थिक व्यवहरांची आणि मालमत्तेची चौकशी अधिक तीव्र करण्यात आली आहे.


दरम्यान, कारवाई दरम्यानप आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खरातच्या बंगल्याबाहेर वार्तांकनासाठी गेलेल्या काही इलेट्रॉनिक मिडियाच्या प्रतिनिधिंसोबत गैरवर्तनाची घटना समोर आली आहे. घरातील काही व्यक्तींनी कॅमेरा आणि मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले असून यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले हाते. या संपूर्ण प्रकारामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments


bottom of page