मंगेश काळोखे हत्या प्रकरण, सुपारी देवूनच घडवली हत्या !
- Navnath Yewale
- Jan 3
- 2 min read

खोपोली : खोपोलीतील शिवसेना नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणात मोठ्या घडामोडी समोर येत आहेत. अशातच आज नवव्या दिवशी त्यांच्या दोन्ही मुली आणि पुतण्या पहिल्यांदाच बोलता झाला असून त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. दिवंगेत काळोखे यांच्या मुलींनीतर त्यांनाही मारण्याचा प्लॅन हल्लेखोरांचा होता असा दावा केला आहे. या दाव्यानंतर रागडमध्ये एकच खळबळ उडाली असतानाच आता रागडच्या पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी मोठी माहिती समोर आणली आहे.
त्यांनी या प्रकरणात आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आल्याचे सांगत काळोखे यांची हत्या सुपारी देऊनच करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याचे म्हटलं आहे. तर हल्ल्यात संशयीत असणार्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत यांचा या गुन्ह्यात अद्याप तरी सहभाग आढळून आलेला नसल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणामुळे आता पोलिसांकडून घारे आणि प्रवक्ते भगत यांना क्लिनचिट दिली की काय अशी चर्चा रायगडच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवनसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घुण हत्या राजकीय वैमानस्यातून करण्यात आली होती. ज्यानंतर राज्यभर संंताप पसरला होता. तर या हत्येचे खरे सुत्रधार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत असल्याचा गंभीर आरोप याअधीच शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. पण आता या बाबत मोठी माहिती पोलिसांच्या हाती आहे.
या घटनेच्या नवव्या दिवशी काळोखे कुटुंबांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला आहे. तसेच काळोखेंच्या दोन्ही मुलींनी आक्रोश करत मोठा दावा केला आहे. त्यांनी प्रसार माध्यमांशी पहिल्यांदाच बोलताना आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तर हल्लेखोरांनी या दोन्ही मुलींनाही ठार मारण्याची धमकी दिली होती असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे. यामुळे रायगडसह राज्यभर एकच खळबळ उडाली असून या हत्या प्रकरणाला पुन्हा राजकीय वळण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, प्रवक्ते भरत भगत यांचा या गुन्ह्यात अद्याप तरी सहभाग अढळून आलेला नाही. अशी माहिती दिली आहे. तसेच त्यांनी या प्रकरणाचा अद्याप तपास सुरू असून तो अंतिम टप्प्यात आहे. तसेच काळोखे यांची हत्या सुपारी देऊन करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याचे म्हटलं आहे. त्या या प्रकरणाशी संबंधीत अटक करण्यात आलेल्यांबाबत माहिती देत असताना बोलत होत्या.
26 डिसेंबर रोजी मंगेश काळेखे मुलींना शाळेत सोडून घरी परतत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. तर त्यांचा पाठलाग करून तलवार, कोयता आणि कुर्हाडीने वार केले होते. या हल्ल्यांनतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले होते. एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना दिवसाढवळ्या अशी हत्या करण्यात आल्याने खोपोली शहरासह रायगड जिल्हा हादरला होता. आतापर्यंत या प्रकरणात रवींद्र देवकर, धनेश देवकर, दर्शन देवकर, सचिन चव्हाण यांच्यासह 12 जणांना अटक करण्यात आली आहे.



Comments