पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेच्या पीएच्या डॉक्टर पत्नीची आत्महत्या
- Navnath Yewale
- Nov 23
- 3 min read
नातेवाईकांना घातपाताचा संशय, अंजली दमानिया आक्रमक

मुंबई : भाजप नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहायकाच्या डॉक्टर पत्नीने आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे यांनी वरळीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, काही महिन्यापूर्वीच विवाह झालेल्या गौरी यांनी शनिवारी सायंकाळी 7 वाजता हे टोकाचं पाऊल उचललं आहे.
मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचा विवाह 7 फेब्रूवारी रोजी बीड येथे मोठ्या थाटामाटात झाला होता. या लग्नाला पंकजा मुंडे आणि माजी खासदार प्रितम मुंडे देखील उपस्थित होत्या. लग्नाला अवघे 10 महिने पूर्ण होण्या आधीच गौरी यांनी आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, अनंत गर्जे यांचे विवाहबाह्य संबंध असल्याने गौरी अस्वस्थ होत्या, अशी माहिती समोर येत आहे. याच नैराश्येतून त्यांनी पाऊल उचलल्याचा दावा केला जात आहे.
दरम्यान, घटनेबाबतची माहिती मिळताच वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर या घटनेचे सत्य बाहेर येईल, असं सांगितले जात आहे.
मंत्री पंकजा मुंडे: राज्याच्या पर्यवरण मंत्री पंकजा मुंडे यांची या घटनेवर प्रतिक्रिया समोर आली आहे. मंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. मंत्री पंकजा मुंडे निवेदनाद्वारे म्हणाल्या की, “ काल दि.22 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6:30 ते 6:45 वाजण्याच्या सुमारास माझा पीए अनंतचा फोन दुसर्या पीएच्या फोनवर आला होता. तो खूप रडत होता. पत्नीने आम्हत्या केल्याचे अत्यंत अक्रोशाने त्याने मला सांगितले. ही गोष्ट माझ्यासाठी खूप धक्कादायक होती. पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये व त्यांनी योग्य तपास करून या विषयाला हाताळावे, असे माझे म्हणले आहे, तसे मी पोलिसांनादेखील सांगितले आहे,” असे पंकजा मुंडेच्या कार्यालयाने म्हटले आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे. “ गौरीच्या वडिलांशी मी बोलले. ते प्रचंड दु:खात आहेत, हे मी समजू शकते. अशा घटना जीवाला चटका लावून जातात आणि मनाला सुन्न करतात कोणाच्या वैयक्तिक जीवनात काय चालू असतं, हे अनाकलनीय आहे. अचानक धक्कादायक अशी ही घटना घडली असल्याने मलाही अस्वस्थ वाटत आहे.”
दरम्यान गौरीच्या कुटुंबियांनी गर्जे कुटुंबावर अनेक केले आहेत. गौरीचे मामा श्रीनिवास यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, अनंत गर्जेने तिच्या वडिलांना फोन केला आणि लगेच कटही केला. त्यानंतर त्याने गौरीच्या आईला फोन केला आणि सांगितले की, गौरीने गळफास घेतला आहे. अनंत गौरीचा छळ करत होता. गौरीला अनंतबाबत काही गोष्टी समजल्या होत्या. त्यावरून त्यांच्यात वाद होते. गौरीच्या लग्नात तिच्या वडिलांनी 60 लाख रुपये खर्च केला होता. लग्नानंतर दोन महिने बरे गेले. त्यानंतर तिला अनंतने छळायला सुरुवात केली.

अंजली दमानिया आक्रमक: गौरीच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेत गर्जे कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधत न्यायव्यवस्थेच्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. न्याय कशाला म्हणायचे हे कळत नाही. डॉक्टर मुलीची आत्महत्या आहे. गौरी आत्महत्या करेल अशी बिल्कुल मुलगी नव्हती. लग्नात आई वडील असताना त्यांना ही घटना कळाली. एका स्टेटमेंट मध्ये आत्महत्या केले असे म्हटले होते. याप्रकरणी पोलिसांच्या तपासानंतर आणि डॉक्टर च्या रिपोर्टनंतर ही हत्या आहे की आत्महत्या हे स्पष्ट होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
गौरी साधी होती, पण ट्राँग होती, आत्महत्या करेल अशी ती मुलगी नव्हती. गौरीच्या आईवडिलांना रात्री पावणे सातच्या आसपास कळालं. ते बीडला लग्नात होते. तिथून ते वरळी पोलिस ठाण्यात आले. त्याच्या आधी त्यांना मुलीला अशा अवस्थेत नायर हॉस्पिटलमध्ये पहावं लागलं. पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर व्हायला वेळ लागला. आधी स्टेटमेंटमध्ये आत्महत्या केली असं म्हटलं होतं. पण वडिलांनी सांगितलं आम्हाला माहित नाही तिने आत्महत्या केली की तिचा घात केला. तर आताचे एसीपी चांगले आहेत. त्यांनी ताबडतोब करेक्शन केलं. आम्ही त्यांना सांगितलं आता एफआयआर केला आहे, अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली.
पुढे बोतलाना दमानिया म्हणाल्या की, आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं असा एफआयआर आहे. पोस्टमार्टेममध्ये घात झाल्याचं निष्पन्न झाल्यावर सव्लिमेंटरी जोडून 302 चा गुन्हा दाखल करू असं पोलिसांनी सांगितलं. ते फॅक्ट आहे. मी दोन सरकारचे पीपी आहे त्यांच्याकडे कन्फर्म केलं. डोकं सुन्न करणार्या गोष्टी महाराष्ट्रात होत आहे. अशा लोकांना काय म्हणायचं. शिक्षा झाली पाहिजे हे आपण तेच बोलतो. आधी वैष्णवी झाली. नंतर संपदा झाली. संपदाही बीडचीच होती. आता गौरी. आईवडिलांनी काबाडकष्ट करून मुलींना उच्चशिक्षित केलं. त्यानंतर हे होत असेल तर लोकांची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असा गभींर आरोप अंजली दमानिया यांनी केला.



Comments