top of page

मंत्री भुजबळांच्या वक्तव्यांवर अजित पवारांची थेट नाराजी

भुजबळ म्हणाले अजित पवार मला बोललेच नाहीत, मी अजित पवारांना स्पष्टच सांगितलं आहे.


ree

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या भुमिकेवरून पक्षप्रमुख अजित पवार नाराज असल्याची चर्चा सातत्याने राजकीय वर्तुळात होत असते. त्यातच अजित पवारांच्या उपस्थितीत मंगळवारी रात्री हॉटेल ट्रायडंट येथे राष्ट्रवादीच्या बैठकीतमध्ये अजित पवारांनी मंत्री भुजबळांसमोर नाराजी व्यक्त केल्याने यात आणखीच भर पडली. राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) पक्षाच्या आमदार व पदाधिकार्‍यांच्या बैठकीत अजित पवारांनी नाराजी जाहिर केली.


मंगळवारी हॉटेल ट्रायडंट मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या आमदार पदाधिकार्‍यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत अजित पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री छगन भुजबळ समोर असताना म्हणाले की, काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात, त्यांचं मत हे पक्षाची प्रतिमा चूकीची करते. पक्षाला किंमत मोजावी लागते, असं म्हणत अजित पवारांनी छगन भुजबळांच्या समोरच नाराजी व्यक्त केली. छगन भुजबळ यांनी आझाद मैदान येथे मराठा जीआरबाबत मांडलेली भूमिका यावरून अजित पवार यांनी आमदारांच्या बैठकीत थेट नाराजी व्यक्त केली.


अजित पवारांच्या सूचना

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत प्रत्येक जिल्ह्यात राजकीय परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे युतीबाबत स्थानिक स्तरावर निर्णय घ्या, असा सूर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत पाहायला मिळाला. सध्या राज्याची आर्थिक स्थिती फार भक्कम नाही. तरी शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी पॅकेज दिले. त्यावरून विरोधकांनी अरोप केले तरी आपले सरकार काम करते हे जनतेला आवर्जुन सांगा, अशा सूचना अजित पवारांनी दिल्या. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत पुढील आठवड्यात जिल्हाध्यक्ष बैठक घेऊन अधिक चर्चाृ करणार असल्याचेही अजित पवार म्हणाले. यावेळी अजित पवार यांनी आमदारां सोबत संवाद साधला. शिवाय कॅबिनेट बैठकीतील माहितीही आमदारांना दिली.


छगन भुजबळ आक्रम :

सरकारडून मराठवाड्याचा 8 जिल्ह्यातील नोंदी शोधण्याबाबत सांगितलं जात आहे. मराठा आरक्षणासाठी जो जीआर काढण्यात आला आहे, तो दबावाखाली काढण्यात आला आहे. सरकारने ओबीसी समाजाची जी समीती निर्माण केली त्याबाबत देखील कोणतीही चर्चा झालेली नाही. हा जीआर काढण्यापूर्वी हरकती सूचना घेणं अपेक्षित होतं. मात्र, सरकारकडून ते देखील झालं नाही. हे मुद्दे आम्ही दिलेल्या पत्रात लिहिले आहेत. या सोबतच हा जीआर रद्द करा, अशी मागणी छगन भुजबळांकउून करण्यात येत आहे. जीआरमध्ये तुम्ही कुणबी मराठा, मराठा कुणबी असं म्हणायला पाहिजे होतं. मात्र, तुम्ही जीआर मध्ये मराठा समाज असा उल्लेख केला आहे. एसईबीसी कायद्यानुसार आधीच 10 टक्के आरक्षण मराठा समाजाला दिले आहे, मराठा समाज शैक्षणिक आर्थिक मागास यासाठी हे आरक्षण दिलं आहे. पण, मराठा हा सामाजिक मागास नाही, अशी भुमिकाही छगन भुजबळ यांनी मांडली.


अजित पवारांच्या नारजीवर भुजबळ म्हणाले की, “अजित पवार मला काही बोलले नाहीत, मला बोलायचं असतं तर ते थेट बोलले असते, असे म्हणत अजित पवारांची आपल्यावर कुठलीही नाराजी नसल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं.

तसेच मी अजित पवारांन स्पष्ट बोललोय, मी 35 वर्षापासून समाजासाठी काम करतोय, मी शिवसेना त्याच कारणाने सोडली होती. ते काम मी कुठंही गेलो तरी चालूच राहणार, त्यास मला कुणाचंही बंधन नाही. मी समाजाची भूमिका मांडायला हरकत नाही. ” असं शिर्डीत माध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले.


दरम्यान अजित पवारांनी साप पाळले, मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यावर भुजबळ यांनी जरांगे पाटलांवर हल्लाबोल केला. “तुम्ही लोक काय त्याच्या नादी लागलाय? त्याला काही काम धंदा नाही, त्याला शिक्षण आहे का? काही माहीत आहे का? मला बाळासाहेब ठाकरेंनी नेता केलाय, 57 वर्षे झाले मला, मी मुंबईचा दोनदा महापौर झालो. मंडल आयोगामुळे काँग्रेसमध्ये गेलो, त्याला राजकारणात कोण कधी आलं माहीत आहे का?. 1991 साली मी कॅबिनेट मंत्री झालो, जे आज मंत्री आहेत तेव्हा कोणीही नव्हतं, असा पलटवार भुजबळ यांनी जरांगे पाटलांवर केला. तसेच माझ्या भूमिकेला मनातून सर्वांचेच समर्थन आहे, मराठा समाजाला इडब्ल्यूएसचे आरक्षण दिल्यानंतर सर्व प्रश्न मिटले होते. मात्र, हा दारुवाले आणि वाळूवाल्यांचा लिडर, हा लढाया, मारामार्‍या कारायला लिडरशिप करतोय. देशातलं वातावरण बिघडवण्यासाठी कारणीभूत झालाय. त्याला अक्कलच नाही, त्याच्याकडून सुसंस्कृतपणाची अपेक्षा कशी करू शकता? असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला.

Recent Posts

See All
स्वबळाचा नारा काँग्रेसचा ! फायदा मात्र भाजपाचा !!

मुंबई महापालिका निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढणार! असा नारा भाई जगताप यांनी दिला आणि मुंबईचे राजकारण पुन्हा एकदा तापू लागले. मतदार यादीत घोळ झाला असा आरोप करीत भाजपा विरोधकांनी एकजुटीने आक्रमक भूमिका

 
 
 

Comments


bottom of page