top of page

‘मतचोरी’ चे आणखी पुरावे, लवकरच जाहिर करणार- राहुल गांधी

ree

भोपाळ: ‘लोकशाही आणि संविधानावर हल्ला’ होत असल्याचा दावा करत, काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘मतचोरी’च्या मुद्यावरून भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि निवडणुक आयोगावर आज (दि.9) पुन्हा एकदा निशाणा साधाला. अपल्याकडे आणखी पुरावे असून ते लवकरच जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


प्रत्येक आठ मतांपैकी एक मत चोरले गेले: मध्य प्रदेश दौर्‍यावर असलेले राहुल गांधी यांनी पचमढी येथे माध्यमांशी बोलताना म्हणले की, “ मतचोरी स्पष्टपणे झाली आहे. पंचवीस लाख मत चोरली गेली आहेत. प्रत्येक आठ मतांपैकी एक मत चोरले गेले आहे. आकडेवारी पहिल्यानंतर, मला वाटते की मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातही असेच घडले आहे. ही भाजप आणि निवडणूक आयोगाची एक व्यवस्था आहे. आमच्याकडे आणखी पुरावे आहेत, आणि ते आम्ही काही वेळाने दाखवू.”


निवडणुकीतील गैरव्यवहार संस्थात्मक स्वरूप देण्यासाठी सत्ताधारी भाजपने एक यंत्रणा तयार केल्याचा आरोपही त्यांनी केला. मुख्य मुद्दा मतचोरीचा आहे आणि ‘एसआयआर’ ही ती झाकण्यासाठी आणि संस्थात्मक करण्यासाठीची एक व्यवस्था आहे, असेही ते म्हणाले.


गांधी म्हणाले, “आमच्याकडे सविस्तर माहिती आहे. आम्ही आत्तापर्यंत खूप कमी दाखवले आहे, पण मुख्य मुद्दा हा आहे की लोकशाही आणि भारतीय संविधानावर हल्ला होत आहे.


पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञाणेश कुमार हे थेट संयुक्त भागीदारीतून करत आहेत. यामुळे देशाचे मोठे नुकसान होत आहे. असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, राहुल गांधी यांनी पचमढी येथे मध्य प्रदेश युनिटच्या पक्षनेत्यांशी संवाद साधला. राहुल गांधी यांनी शनिवारी ‘ संघटन निर्माण अभियाना ’ अंतर्गत जिल्हा /शहर अध्यक्षांसाठी प्रशिक्षण शिबिराला संबोधित केले आणि इतर महत्वाच्या मुद्यांवर चर्चा केली.

Comments


bottom of page