मराठा आंदोलनात खासदार श्रीमंत शाहू महाराजांची एन्ट्री
- Navnath Yewale
- 4 days ago
- 1 min read

गेल्या चार दिवसांपासून मुंबईत संघर्ष मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन सुरू आहे. राज्यभरातून अनेक मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. गावागावात आता या लढ्यास पाठिंबा मिळत असताना कोल्हापुरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी या लढ्यामध्ये एन्ट्री केली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मागणी करत त्यांनी राज्य सरकारलाच थेट सरकारलाच थेट इशारा दिला आहे. त्या संदर्भात त्यांनी परिपत्रक काढत राज्य सरकारलाच धारेवर धरले आहे.
सरकारच्या कोणत्याही अश्वासनावर विश्वास ठेवून मराठा समाज आंदोलन मागे घेण्याच्या तयारीत नाही. त्यामुळे आंदोलनाची नोंद गांभीर्याने घेण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. आरक्षणाची 50% मर्यादा वाढवावी हा आम्ही पर्याय सुचवला होता. त्यासाठी घटनेमध्ये दुरुस्त करावी जेणेकरून मराठा समाजाला आरक्षण मिळेल, असेही सुचवल्याचे खासदार श्रीमंत शाहू महाराज म्हणाले.
निवडणुकीच्या काळात महायुतीने कायद्याच्या निकषावर टिकेल असे आरक्षण दिले जाईल असे आश्वासन दिले होते. त्यामुळेच राज्यातील जनतेने महायुतीला सत्ता दिली. आता मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. नोकरी आणि शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज आता थांबणार नाही. तर सरकारने आश्वासन पूर्तता करण्याची हिच वेळ योग्य आहे. त्यामुळे सरकारने आपले आश्वासन पाळावे असेही आवाहन शाहू महाराज यांनी केले आहे.
पण महायुती मधील नेते हे आरक्षणाच्या मुद्यालाच बगल देण्याचा प्रयत्न करत असल्याचे आता दिसत आहे. सरकार जबाबदारी टाळू लागले तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. याची सरकारने जाणीव ठेवावी असा इशारा खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी राज्य सरकारला दिला आहे.
Comments