मराठा आरक्षणासाठी लढा देणारं कणखर महिला नेतृत्व हारपलं: माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन
- Navnath Yewale
- 13 hours ago
- 4 min read

मुंबई: महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधुम सुरू असतानाच राजकीय क्षेत्रातून दु:खद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं निधन झालं आहे. त्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी होत्या. शालिनीताई पाटील यांनी मुंबईतील माहिम येथील राहत्या घरी 94 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आवाज उठवणार्या महिला राजकारणी म्हणून ओळख असलेल्या डॉ. शालिनिताई पाटील यांची प्राणज्योत शनिवारी (दि.20 डिसेंबर) मालवली. तसेच आरक्षणासाठी शालिनीताई यांनी आपल्या खुर्चीचीही तमा बाळगली नाही. राजमाता जिजाऊ यांच्यावर जगात पहिला चरित्र ग्रंथ लिहणार्या लेखिका म्हणजे शालिनीताई पाटील होत्या. शालिनीताई यांनी नेहमीच पुरोगामी विचारांचा पुरस्कार केला होता.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या शालिनीताई दुसर्या पत्नी होत्या. काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मुंबईतील माहिम येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सातार्यातील कोरेगाव तालुुक्यातील मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
शालिनीताई पाटील यांची महाराष्ट्राच्या राजकारणात एक कणखर महिला राजकारणी म्हणून ओळख होती. पण आता त्यांच्या निधनानं काँग्रेसवर शोककळा पसरली आहे. पण शालिनीताई वसंतदादांच्या कठीण काळात त्यांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेंनी शालिनीताई महाराष्ट्राच्या राजकारणातील वाघीण असा उल्लेख केला होता. वसंतदादाच्या निधनानंतर व मुलगा चंद्रकांत पाटील यांच्या अपघाती निधनाने शालिनीताई एकाकी झाल्या.पुढे शालिनीताई सातत्यानं पक्षांतर करत राहिल्या.
शालिनिताई पाटील यांनी सन 1951 मध्ये राष्ट्रसेवा दलाची क्रियाशील कार्यकर्ती म्हणून राजकीय जीवनाची सुरूवात केली, यामध्ये त्या पहिल्यांदा सातारा रोडच्या शाखा प्रमुख होत्या. मार्च 1957 मध्ये पुणे विद्यापीठातून बी.ए.ऑनर्स राजाराम कॉलेज कोल्हापूर येथून पदवी मिळवली. एप्रिल 1957 मध्ये काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर जिल्हा लोकल बोर्ड सांगलीची निवडणुक लढवून त्या विजयी झाल्या. जिल्हा लोकल बोर्डचे नंतर जिल्हा परिषदेत रुपांतर झाले.
1963 मध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मधून एल.एल.बी. पूर्ण केली तीही सर्वप्रथम क्रमांकाने
1964 अखेर जिल्हा परिषद सांगलीचे सदस्य म्हणून कामकाज पाहिले. सन 1962 ते 64 या कालावधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महिला फ्रंटच्या प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदार सांभाळली. 1964 ते 72 सेक्रेटरी टू वसंतरावदादा पाटील. 1971 मध्ये भारत देशातील महिलांची सहकारी बँक श्री. लक्ष्मी महिला सहकारी बँक लि. सांगलीची स्थापना केली. 1974 मध्ये मा. वसंदादा पाटील व शंकरराव चव्हाण यांनी एकत्र बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा सुसंवाद घडविण्या बाबत विशेष प्रयत्न केले. 1974 महाराष्ट्रात राज्यभर दौरा करून राजमाता जिजाऊ मा साहेब यांचे जीवन चरित्रावर संशोधन, अभ्यास व लेखन. 1977 राजमाता जिजाऊ मा साहेबांच्या जीवनावरील ऐतिहासिक ललीतचरित्र ग्रंथाचे यशवंराव चव्हाण अर्थमंत्री भारत सरकार यांचे शुभहस्ते श्री शिवाजी मंदिर मुंबई येथे प्रकाशन केले. 1977 ते 79 काँग्रेस संघटनेत विविध पातळीवरील जबाबदारी सांभाळली.
1979 मध्ये एस काँग्रेसमधून बाहेर पडून आय काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. जानेवारी 1980 मध्ये सातारा लोकसभा मतदार संघातून काँग्रेस (आय) पक्षाकडून निवडणुक लढविली. त्याचवेळी कोरेगांव-खटाव तालुक्याकरीता सहकारी साखर कारखाना काढण्याचा संकल्प केला. जून 1980 सांगल मतदार संघातून काँग्रेस आय पक्षाची उमेदवार म्हणून विधानसभेची निवडणुक लढविली आणि जिंकली. सन 1982 मध्ये अंकलखोप, जि. सांगली येथे मा. वसंतदादा पाटील आणि मा. यशवंतराव चव्हाण मनोमिलनासाठी यशस्वी प्रयत्न केले. जून 1980 ते ऑक्टोबर 1982 महसुल व पुनर्वसन मंत्री म्हणून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काम केले. या कालावधीत वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूट या संस्थेस 200 एकर शासकीय जागा दिली व संस्थेच्या कामाचा शुभारंभ केला. व्ही.एस.आय. ही आज एक साखर कारखानदारीला मार्गदर्शक म्हणून काम करणारी अग्रगण्य संस्था आहे.
ऑक्टोबर 1982 ते फेब्रुवारी 1983 महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळात सार्वजनिक बांधकाम आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून कार्यभार सांभाळला. मार्च 1983 -स्व.श्री. वसंदादा पाटील यांचेसाठी आमदारकीचा राजीनामा देवून सांगली विधानसभेची जागा रिक्त केली. नोव्हेंबर 1983 मध्ये सांगली लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणूक लढविली आणि जिंकली. नोव्हेंबर 1983 ते नोव्हेंबर 1984 खासदार म्हणून कामकाज केले या कालावधीत साखर कारखान्यांच्या लायसेन्सींग पॉलिसी संदर्भातील भारत सरकारचे धोरण बदलले जावे म्हणून यशवंतरावजी चव्हाण यांचे नेतृत्वाखाली खास प्रयत्न केले व जिथे ऊस तिथे कारखाना देणेचे नवे धोरण निश्चित करणेकामी अग्रक्रमाने पुढाकार घेतला व तसे धोरण जाहीर झाले.
दरम्यान या धोरणामुळेच कोरगांव- खटाव तालुक्यातील सहकारी साखर कारखान्यास इरादापत्र मिळण्याचा मार्ग खुला झाला. खासदार पदाचे कालावधीतच विशेषत: सांगली जिल्ह्याचा दुष्काळी भाग व पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भाग यावर लोकसभेमध्ये पहिले भाषण केले. त्यानुसार ताकारी योजना मंजूर झाली. या योनजेचा भूमीपूजन समारंभ देवराष्ट्रे या गांवी यशवतरावजी चव्हाण व शालिनीताई पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. सन 1984 ते 1989 कोरेगांव- खटाव तालुकसाठी सहकारी साखर कारखाना काढण्याचे प्रयत्न केले. सन 1989 मध्ये कारखान्यास इरादापत्र मिळाले. सन 1987 मध्ये महाराणी तराराणी या विषयावर प्रबंध लिहून मुंबई विद्यापीठाकडून डॉक्टरेट मिळविली. सन 1988 श्री शिवाजी मंदिर मुंबई येथे छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर यांचे शुभहस्ते महाराणी ताराराणी हा इंग्रजी प्रबंध प्रसिद्ध केला. सन 1989 ते 1997 कोरेगांव- खटावचे श्रीजरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यासंदर्भात कोर्टमॅटर, दोन वेळा सुप्रिम कोर्ट, शासकीय अर्थसहाय्य मिळवणे, शेअर्स जमविणे, कर्ज उभारणी, शासकीय थकहमी इत्यादीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा व त्यात यश मिळवले.
सन 1998-99 मध्ये श्रीजरंडेश्वर सहाकरी साखर कारखाना लि. ची उभारणी पूर्ण व ट्रायल सिझनची यशस्वी पूर्तता. सन 1992 मध्ये स्व. सुपूत्र चंद्रकांत पाटील यांचे नावाने सातारारोड येथे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सुरू केले. सप्टेंबर 1999 मध्ये कोरेगांव विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतिने निवडणुक लढवली आणि जिंकली. जानेवारी 2001 सिंदखेडराजा येथे पहिल्या जिजाऊ पुरस्कारोन सन्मानीत. 8 ऑगस्ट 2001 राजमाता जिजाऊ या ललीत चरित्र ग्रंथाचे दुसर्या आवृत्तीचे प्रकाशन तत्कालीन विरोधी पक्षनेते नारायण राणे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे हास्ते केले. सन 2002 मध्ये श्रीजरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचा श्रीजरंडेश्वर उद्योग समुह व्हावा म्हणून प्रयत्नशील. त्याचाच भाग म्हणून पाठपुरावा करून डिस्लरी प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प यासाठीची लायसेन्स मिळविली, नियोजित चेतक कृषी अवजारे प्रकल्पाचे काम सुरू, मेडिकल कॉलेजकरीताचा प्रस्ताव पाठपुरावा सुरू आहे,
जून 2004 पासून कोरेगावं येथे कॉलेज सुरू करण्याचे प्रयत्न सुरू त्याचबरोबर वसना आणि वांगणा प्रकल्प कोरेगांव तालुक्याच्या उत्तर व उत्तर पूर्व दुष्काळी भागासाठी रु.180 कोटीच्या वसना व वांगणा उपसा जलसिंचन योजना मंजूर करून घेतल्या. या योजनांमुळे 20,000 एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. शिवाय सुमारे 40 गावे लाभक्षेत्राखाली येणार आहेत. दोन्ही योनांना प्रशासकीय मान्यता मिळवली. आराखडे तयार झाले. योजनांची कामे प्रगतीपथावर असून या सर्व बाबीकरीता सन 1995 पासून प्रयत्नशील आहेत. खासगीकरणाच्या माध्यमातून वरील योजना करून घेण्यासाठी शासनाची मान्यता मिळाली आहे.



Comments