मराठा नेत्यांना संपवण्याचा फडणवीसांचा डाव; 30 ते 32 आमदार, खासदारांचे फोन आल्याचा जरांगे पाटलांचा दावा
- Navnath Yewale
- Aug 10
- 1 min read

मराठा आंदोलक जरांगे पाटीलयांनी 29 ऑगस्टला ‘चलो मुंबई’ चा नारा दिला आहे. त्या पार्श्वभूमिवर जरांगे पाटील यांचे राज्यभर दौरे सुरू आहेत. सांगली, सातारा, कोल्हापुर नंतर आज त्यांनी आहिल्यानगर (अहमदनगर) दौर्यावर असताना त्यांनी पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधला.
यावेळी भाजपमधील मराठा नेत्यांची अस्वस्थता सांगत त्यांनी खळबळ उडवून दिली. भाजपमधील अनेक मराठा नेते मला फोन करून सांगतात की त्यांना त्रास दिला जात आहे. आतापर्यंत मला 30-32 आमदार- खासदारांचे फोन आले आहेत,“ असा दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस मराठ्यांचे नेते आणि अधिकारी संपवण्याच्या कामाला लागले आहेत, असा खळबळजनक दावा जरांगे पाटील यांनी केला आहे.
प्रत्येक मंत्र्यांना फडणवीस यांनी स्वत:चे ओएसडी दिले आहेत. भाजप वेगळा होता. पण फडणवीस यांन पक्षाची दिशा बदलली आहे. सत्तेसाठी त्यांनी नारायण राणे, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण यांसारख्या अनेक नेत्यांना पक्षात घेतले. एवढेच नव्हे तर भाजपमधीलच अनेक नेते संपवण्याचे कामही सुरू आहे, असा दावा देखील जरांगे पाटील यांनी केला.
‘सत्तेसाठी आपल्या लोकांना लाथा मारण्याचं काम सुरू आहे, आणि माझ्याकडे त्याची यादीही आहे. जालना, सोलापूर आणि नांदेड इथंही अनेक मराठा नेत्यांना त्रास दिला जात आह . असेही जरांगे पाईल यांनी म्हटले आहे. “ आमची परिस्थती बिकट आहे ” असे सांगणारे नेते दररोज संपर्क साधत आहेत, असा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे.
मराठा आरक्षणसाठी लढा तीव्र करणार असल्याची भुमिका मनोज जरांगे पाटलांनी मांडली. मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरं आरक्षण आम्ही घेणार नाही. 29 ऑगस्टला चलो मुंबईच्या निर्णयावर आम्ही ठाम असल्याचेही जरांगे पाटील म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये समाज निर्णय घेईल. मी, याबाबत भूमिका घेण्याचा आक्रस्ताळेपणा करणार नाही. समाजाला जो निर्णय वाटेल तो समाज घेईल फक्त आरक्षणाच्या मुद्यावर आम्ही ठाम आहोत, अशीही भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली.



Comments