top of page

महादेव मुंडे हत्या प्रकरण; वाल्मिक कराडचा मुलगा सुशील संतापला!

महादेव मुंडे यांना वडिलांसह आम्ही दोघे भाऊ ओळखत नव्हतो; सीबीआय चौकशी करा, लवकरच आम्ही कुटुंबीय पत्रकार परिषदे घेऊन खुलासे करणार

ree

परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात खळबळजनक आरोप बाळा बांगर यांनी केला होता. तर वाल्मिक कराडची दोन्ही मुलं देखील या हत्येत सहभागी असल्याचा दावा आमदार सुरेश धस यांनी केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडेच्या हत्या प्रकरणात एसआयटीची स्थापना केली आहे. यानंतर अवघ्या काही तासांतच परळीतून पाच जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली होती.


ज्या पाच जणांना ताब्यात घेत चौेेेेकशी करण्या आली होती. त्यामध्ये वाल्मिक कराडची दोन्ही मुलं श्रीगणेश आणि सुशील या दोघांचा समावेश होता. पोलिसांनी या दोघांची तब्बल 17 तास कसून चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. आता या पार्श्वभूमिवर वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याने माध्यमांसमोर बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.


सुशील कराड म्हणाला की, महादेव मुंडे यांना माझे वडील मी आणि माझा भाऊ ओळखत देखील नव्हतो. आमची हात जोडून विनंती आहे की, तुम्ही एसआयटी, सीआयडीची मागणी करतात. मात्र मी सीबीआय चौकशीची मागणी करत आहे. एकदा होऊनच जाऊ द्या, त्यांना काय सिद्ध करायचं आहे. त्यांच्याकडे देखील काह पुरावे असतील तर आमच्याकडे देखील पुरावे आहेत. आमचे सर्व कुटुंब पत्राकर परिषद घेणार आहोत.


त्यात आमची भूमिका मांडणार आहोत. यात सीबीआय चौकशीची मागणी आम्ही करत आहोत. यातूप जे सत्य आहे ते समसेा येईल. असंही सुशील कराड म्हणाला.


सुशील कराड पुढे बोलताना म्हणाला की, 20 महिन्यानंतर कुणाचं तरी नाव घ्यायचं, यात किती सत्यता आहे? या प्रकरणाचा तपास कुमावत साहेब करत आहेत. त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. माझ्या भावाची आणि माझी कोणतीही——17 चौकशी झालेली नाही. माझा भाऊ डिस्चार्ज एप्लीकेशनबाबत पिटीशन दाखल करण्यासाठी गेला आहे. माझा भाऊ बाहेर देशात पळून जायचा प्रयत्न करत असेल तर त्याचे पुरावे द्यावे, माझा आणि माझ्या वडिलांचा पासपोर्ट नाही आणि त्याला जर पळून जायचं असेल तर तो कधी पळून गेला असता. यात आमचा कोणताही संबंध नाही. जे असेल त्याला आम्ही सामोरे जाऊ, असेदेखील त्याने म्हटले.


ज्ञाणेश्वरी मुंडेकडे कोण ऑफर घेऊन गेलं?:

धनंजय मुंडे यांना का टार्गेट केले जातं हे सर्वांना माहित आहे. महादेव मुंडे यांना माझे वडील मी आणि माझा भाऊ ओळखत नव्हतो. ज्यावेळी व्यक्तीला ओळखत नाही त्या व्यक्तीला मारायचा संबंध काय? ज्ञाणेश्वरी ताई तुमच्याकडे कोण ऑफर घेऊन आलं त्याचं नाव पुढे करा, असे देखील सुशील कराड माध्यमांशी बोलताना म्हणाले.


ज्ञाणेश्वरी मुंडेचा पलटवार :

ज्ञाणेश्वरी मुंडे यांनी यावर प्रत्यूत्तर देताना म्हटलं आहे की, “ जर महादेव मुंडेंना ओळखत नव्हता, तर पोलिसांना का कॉल केला? आणि तपास थांबवण्याचा फोन कुठून आला होता?”


त्यांनी काही पोलिस अधिकार्‍यांचे सीडीआर काढण्याची मागणी केली होती. विशेषत: सानप भास्कर केंद्रे, डीवायएसपी कविता नेहरकर,आणि ठाकूर यांच्याही कॉल रेकॉर्डची चौकशी झाली पाहिजे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान ज्ञाणेश्वरी मुुंडे यांनी मुख्यमंत्री आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.


याच प्रकरणात एका अनामिक व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधून “ ताईच्या नावाने फ्लॅट करतो, मिडिया ट्रायल थांबवा ” असा प्रस्ताव दिला होता, असा आरोपही त्यांनी केला. या व्यक्तीचं नाव त्यांनी पंकज कुमावत यांना सांगितलं असून, सुशील कराड, त्याचे वडिल आणि मध्यस्थी करणार्‍या व्यक्तीचा रोल तपासण्याची मागणीही त्यांनी केली आहे.


ज्ञाणेश्वरी मुंडेंचे गंभीर आरोप :

ज्ञाणेश्वरी मुंडे यांनी पोलिसअधिकार्‍यांवही संशय व्यक्त करत म्हटलं की, “ पोलिस अधिकारी सपकाळ यांनी माझ्या भावाला आरोपींचे नंबर दिले होते.” तसेच शिरसाळा येथे पोलिस अधिकारी दहिफळे यांच्या सत्काराला गोट्या गित्ते उपस्थित होता, हेही त्यांनी अधोरेखित केलं आहे. त्यांच स्पष्ट मत आहे की, “ खरे आरोपी मोकाट सुटले आहेत आणि त्यांच्यावरच कठोर करावाई व्हायला हवी.”

Comments


bottom of page