top of page

महादेव मुंडें हत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे एसआयटी निर्देश

डम्प डेटा तपासणी, पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी ; दोषी कोणीही असो सोडणार नसल्याचे अश्वासन


ree


परळी येथील व्यवसायिक महादेव मुंडे खुन प्रकरणी आरोपींना अटक करून न्यायाच्या मागणीसाठी आज महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबीयांकडून घटनेची तपशीलवार माहिती ऐकून घेतली. घटनेचे फोटो पाहून मुख्यमंत्री फडणवीस यांनी डोक्याला हात लावत मुंडे कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार पंकज कुमावत यांच्या अध्यक्षेतखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले. शिवाय दोषी कोणीही असो त्याला सोडणार नसल्याचे अश्वानही दिल्याचे ज्ञाणेश्वरी मुंडे म्हणाल्या.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परळी येथील महादेव मुंडे हत्याप्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात कोणीही दोषी असला तरी त्याला सोडले जाणार नाही, असे अश्वासनही त्यांनी दिले. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञाणेश्वरी मुंडे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या हत्येप्रकरणी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.


ज्ञाणेश्वरी मुंडे मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीची माहिती देताना म्हणाल्या की, मी गेल्या 21 महिन्यांतील या प्रकरणाचा तपशील मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. माझे म्हणणे ऐकून मुख्यमंत्री भावनिक झाले. त्यांनी कोणत्याही दोषीला सोडणार नाही, असा शब्द दिला. पुढे त्या म्हणाल्या, “ महादेव मुंडे हत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आणि आरोपींना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी तातडीने बीडच्या पोलिस अधीक्षकांना फोन करून या प्रकरणात कारवाईच्या सूचना दिल्या. डम्प डेटा पुन्हा तपासणी करून दोषींवर कठोर कारवाईचे अश्वासनही दिले असून मुख्यमंत्र्यांच्या अश्वासनावर समाधानी असल्याच्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी मुंडे कुटुंबीयांसमवेत आमदार सुरेश धस, बाळा बांगर यांचीही उपस्थिती होती.


मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर ज्ञाणेश्वरी मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी संवाद साधत धक्कादायक खुलासे केले.


ree

आमदार सुरेश धस

परळीमध्ये एकून तेरा ते चौदा खूनांची प्रकरणे घडली आहेत. त्यापैकी महादेव मुंडे आणि बापू आंधळे यांच्या खूनाचे प्रकरण अजूनही प्रलंबित आहे. महादेव मुंडे यांच्या खूनाला 21 महिने उलटले तरी आरोपींना अटक झालेली नाही. या प्रकरणात काही पोलीस अधिकार्‍यांची नवे समोर आली असून, त्यांचे फोन आणि कॉल डिटेल्स तपासण्याची मागणी करण्यात आली आहेे. संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीना झाला होता. आता माणिकराव कोकाटे यांच्या कृषी खात्याबाबतही चर्चा सुरू आहे. सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारी मुळापासून संपवण्याचे आदेश दिले आहेत. शंभर टक्के व्हायला पाहिजे. त्याची उघडतील तर? त्यासुद्धा फाईल उघडली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे.


परळीतील नागरिकांना आता थोडा दिलासा मिळाला आहे, कारण मोठ्या गाड्यांचे सायरन आणि हॉर्न वाजवणे कमी झाले आहे. महादेव मुंडे यांच्या हत्ते पूर्वी सलग तीन दिवस 19,20 आणि 21 ऑक्टोबर रोजी पुजारी आणि संजय सातभाई यांच्यावर हल्ले झाले होते. या प्रकरणांमध्ये मोका लावण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. बीडचे पोलिस अधीक्षक बदलले पण खालची यंत्रणा जशीच्या तशी आहे. त्यामुळे काही अधिकारी तांदळाच्या खड्यासारखे शोधून त्यांना बीडच्या बाहेर पाठवा. महादेव मुंडे प्रकरणात काही पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांचीही इन्व्हारमेंट आहे का? या चौकशीचीही मागणी केली आहे.


Comments


bottom of page