महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वीच एकनाथ शिंदेंना मुंबईत धक्का
- Navnath Yewale
- Jan 4
- 1 min read

मुंबई: महानगरपालीका निवडणुकीच्या मतदानापूर्वी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. गोरेगावमधील 200 हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे. उमेदवारी आणि पदांच्या वाटपावरून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचा हा सामूहिक राजीनामा आहे. मुंबई गोरेगाव आणि दिंडोशी भागात विभागप्रमुखांसह 200 हून अधकि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.
या वादाचा मुख्य मुद्दा वार्ड क्रमांक 54 आहे, जो शिंदे गटाकडे होता. परंतु नंतर तो भाजपला देण्यात आला. परिणामी, 35 ते 40 पदाधिकार्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा आणि त्यांचे अर्ज मागे न घेण्याचाा निर्णय घेतला. जागा वाटपात त्यांच्याशी अन्याय्य वागणूक देण्यात आल्याचा आरेाप संतप्त कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यांनी आपला संताप व्यक्त करत म्हटले आहे की, “ पक्षाने आमच्या मेहनतीकडे दुर्लक्ष केले आहे आणि बाहेरील लोकांना प्राधान्य दिले आहे” यामुळे जुन्या आणि निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
वरिष्ठ नेतृत्वावर त्यांच्या भावना आणि निष्ठेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, या बंडखोर पदाधिकार्यांनी केवळ त्यांच्या पदांचा राजीनामा देण्याचीच नाही तर अनेक जागांवर स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणुक लढवण्याचा इशारा दिला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने राजीनामे दिल्याने सत्ताधारी महायुती आघाडीची चिंता वाढली आहे. दरम्यान, शिवसेनेने सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोपही केला आहे.



Comments