top of page

महापालिका निवडणूकीत असुद्दीन ओवेसीच्या एमआयएमची मुसंडी 95 पेक्षा आधिक जागा ताब्यात ; छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 33 नगरसेवक

राज्यातील 29 महापालिका निवडणुकीचा निकाल आता समोर आला आहे. या महापालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीने जबरदस्त कामगिरी केली आहे. मात्र, या निकालांमध्ये असुद्दीन औवेसी यांच्या एमआयएमच्या यशाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. राज्यातील महापालिकांच्या निकालांमध्ये 95 हून अधिक एमआयएमचे नगरसेवक निवडून आले आहेत. त्यात मुंबईत 4 जागांवर एमआयएमचे उमेदवार विजयी झाले आहेत.


त्यात मानखुर्द- गोवंडी या भागात एमआयएमने समाजवादी पक्षाला मोठा धक्का दिला. त्यामुळे मुंबईत काँग्रेससह सपासाठी हा मोठा धक्का मानला जातो. मुंबईतील मुस्लीम लोकसंख्या असलेल्या भागात औवेसी यांची जादू चालल्याने दिसून येते.


सोलापूर, धुळे, नांदेड या महापालिकांमध्ये एमआयएमचे प्रत्येकी 8 असे 24 नगरसेवक निवडून आले आहेत. अमरावती महापालिकेत 6, ठाण्यात 5, नागपूरात 4 ठिकाणी एमआयएमचे नगरसेवक निवडून आले आहेत. राज्यातील 29 पैकी 13 महापालिकांत एमआयएमचे 95 नगरसेवक विजयी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत एमआयएमचे सर्वाधिक 33 नगरसेवक निवडून आले आहेत. मालेगाव महापालिकेत एमआयएमचे 20 नगरसेवक निवडून आले आहेत. मुंबईतही एमआयएमच्या विजयाचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात समाजवादी पक्षाला मागे सारत एमआयएमची सरशी झाली आहे.


मुंबई महानगरपालिकेच्या आतापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये भाजपाने 90 जागांवर आघाडी घेतली आहे. तर शिंदेसेना 28 जागांवर आघाडीवर आहे. उद्धवसेना 57 तर मनसे 9 जागांवर आघाडी घेतली आहे. याशिवाय काँग्रेस अजित पवार पक्षाने 3 तर इतरांनी 8 जागांवर आघाडी घेतली आहे. अखेरच्या टप्यामधील 17 जागांचे निकाल येणे बाकी आहे.


छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने शहरात आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 58 जागांच्या आकड्याकडे त्यांची वेगाने वाटचाल सुरू आहे. दुसरीकडे इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखालील एमआयएमने 24 जागांवर मुसंडी मारत सर्वांना धक्का दिला आहे. मात्र, शिंदेसेना केवह 14 जागांवर पुढे आहे. उद्धवसेनेची देखील 6 जागांवर घसरण झाली आहे. वंचित बहुजन आघाडी 04 आणि काँग्रेस, राष्ट्रवादी (शप) प्रत्येक 1 जागांवर पुढे आहेत.

Comments


bottom of page