top of page

महायुतीला घवघवीत यश मिळेल!- मुख्यमंत्री फडणवीस

ree

महानगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद नगरपंचायत या निवडणुका होऊ घातल्या आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी या बैठकांचं संत्र सुरू आहे. यापूर्वी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र हे चार विभागातील बैठका पूर्ण केल्या आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संपूर्ण राज्याच्या विभागात दौरे लावल्याचे फडणवीस म्हणाजे. ज्या इंदिराजींनी संघावर बंदी घातली, त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावं लागल्याचे फडणवीस म्हणाले.


सायंकाळी नागपूर विभागाचा आढावा घेण्यात येईल. पुढील आठवड्यात मुंबईत विभागाचा देखील आढावा घेणार असल्याचे फडणवीस म्हणाले. निवडणूकीसाठी कार्यकर्त्यांची मानसिकता चांगली आहे. पार्टी देखील सज्ज आहे. आढाव्यामध्ये कार्यकर्त्यांना दिशा निर्देशके देऊन सूचना केल्याचे फडणवीस म्हणाले.


युती संदर्भात देखील सूचना देतो आहे. युती झाली पाहिजे अशा आमच्या सूचना आहेत. युती झाली नाही तरी मित्र पक्षावर कोणीही टीका करू नये अशा प्रकारचे निर्देश देण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले. होऊ घातलेल्या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळे असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.


इंदिराजींनाही सत्तेवून पायउतार व्हावं लागलं:

यापूर्वी अनेक वेळा संघावर बंदी घालण्याचा प्रयत्न झाला. ज्या इंदिराजींनी संघावर बंदी घातली. त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं. संघ एक सांस्कृतिक शक्ती आहे. एक देशभक्त अशा प्रकारचा संघटन आहे. राष्ट्रीय विचाराने प्रेरित मूल्यनिष्ट मानव निर्मितीचा कार्य संघ करतं. प्रसिद्धीसाठी ज्या प्रकारचे पत्र देतात त्याकडे आम्ही बघत सुद्धा नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले.


शिक्षक मतदार संघातील बोगस मतदाना संदर्भात आमच्याकडे एक तक्रार आलेली आहे. ती तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडे दिली आहे. येत्या निवडणुकांमध्ये बोगस मतदान होणार नाही याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. खोटे मत नोंदवून कुणालाही या ठिकाणी निवडणुक लढता येणार नसल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Comments


bottom of page