महाराष्ट्र जागतिक क्षमता केंद्र धोरण मंजुर- मंत्रिमंडळ बैठकीत पाच महत्वाचे निर्णय
- Navnath Yewale
- Sep 30
- 1 min read

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबीनेट मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली. मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्रचे जागतिक क्षमता केंद्र ( ग्लोबल कॅपॅब्लिटी सेंटर- जीसीसी) धोरण 2025 मंजुर करण्यासह इतर चार महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत वैद्यकिय शिक्षण व औषधी विभागाअंतर्गत कर्करोग उपचारासाठी सर्वसमावेशक असे धोरण निश्ति करण्यात आले यामध्ये नागरिकांना कर्करोग यासंदर्भात दर्जेदार उपचार मिळणार आहेत.
त्याचबरोबर त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा निश्चित, राज्यभरातील 18 रुग्णालयांतून कर्करोगाशी निगडीत विशेषोपचार उपलब्ध होणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अॅड एज्यूकेशन (महाकेअर फाऊंडेशन ) ही कंपनी स्थापन होणार आहे. कंपनीच्या भागभांडवलासाठी शंभर कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.
उद्योग विभागांतर्गत महाराष्ट्राचे जागतिक क्षमता केंद्र ( ग्लोबल कॅपॅब्लिटी सेंटर -जीसीसी) धोरण 2025 मंजुर करण्यात आल्याने विकसीत भारत 2047 च्या वाटचालीस सुसंगत अशी वाटचाल व्हावी यासाठी गुंतवणूक, बहुराष्ट्रीय सहकार्य या गोष्टींना प्रोत्साहन मिळणार आहे.
उर्जा विभागांतर्गत आद्योगिक वाणिज्यिक व इतर वर्गवारीतील ग्राहकांकडून वीज वापर अतिरिक्त वीज विक्री कर आकारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे प्रधानमंत्री कुसुम घटक ब व अन्य योजनेअंतर्गत सौर कृषीपंपासाठी वीज पुरवठा करण्याकरिता निधी उपलब्ध होणार आहे.
नियोजन विभागांतर्गत महाजिओटेक महामंडळ स्थापनेस मंजुरी देण्यात आली आहे. भू-स्थानिक तंत्रज्ञान चा वापर करून प्रशासनात गतिमान आणणार. या तंत्रज्ञानाचा वापर करून विविध क्षेत्रात धोरणात्मक नियोजन करण्यास आणि निर्णय घेण्यास मतद होणार आहे.
विधी व न्याय विभागामार्फत सातारा जिल्ह्यात फलटण येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय होणार आहे. या न्यायालयासाठी आवश्यक पदांना व त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली आहे.



Comments