महाराष्ट्र हदरला; सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार नांदेडमध्ये शिक्षिकीपेशाला काळीमा फासणारी घटना
- Navnath Yewale
- Nov 21
- 1 min read

नांदेड: नाशिकच्या मालेगावमधील 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आले, त्यानंतर त्या मुलीची हत्या देखील करण्यात आली. ही घटना ताजी असतनाच नांदेडमधून शिक्षकीपेशाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका हैवान शिक्षकाने केवळ 7 वर्षाच्या विद्यार्थीनीवर अत्याचार केला आहे. धक्कादायक म्हणजे ही मुलगी ज्या शाळेत शिकत होती त्याच शाळेत आरोपी शिक्षक म्हणून काम करत होता. या घटनेनंतर पोलिसांनी नराधम शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नोंदड शहरात घडली असून काल 20 नोव्हेंबर रोजी पीडित अल्पवयीन मुलगी शाळेत जाण्यास कुटुंबियांना नकार देत होती. रोज आवडीने शाळेत जाणारी मुलगी आज शाळेत जायला नकार देत असल्याने तिच्या आईने तिला सतत विचारणा केली. तरीही मुलगी गप्प बसल्याने आईने प्रेमाणे तिला जवळ घेऊन विचारल्यानंतर शिक्षकाने केलेला प्रकार तिने सांगितला.
घडलेला प्रकार ऐकून पीडित मुलीची आई संतापली. तिने तातडीने पोलिस स्टेशन गाठले आणि त्या हैवान शिक्षकाविरोधात भाग्यनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून आरोपी शिक्षक विशाल लोखंडे याच्यावर 64(2),65(2) ,351 (2) बीएनएस,468 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान आरोपी शिक्षकास अटक करण्यात आली असून हा खटला फास्टटॅ्रक कोर्टात चालवण्याची विनंती न्यायालयाला करणार असल्याची प्रतिक्रिया उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैजंते यांनी दिली आहे. शिवाय या घटनेचा तपास सुरु असून विद्येचंं मंदिर असलेल्या शाळेतसुद्धा मुली सुरक्षित नाहीत ही धक्कादायक बाब पुन्हा एकदा समोर आली आहे.



Comments