महाराष्ट्र हादला: मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर सहा जणांचा सामुहिक अत्याचार

पालघरच्या तलासरीतील धक्कादायक घटना; तलासरी पोलिसात गुन्हा, तीन नराधम आरोपी अटक , फरार आरोपींच्या शोध सुरू
पालघर: राज्यातील महिलां, तरुणींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. एकीकडे सरकार महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत गंभीर असून पोलिसांनाही तातडीने कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. मात्र, महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. आता, सामुहिक लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं पालघर जिल्ह्यातील तलासरी हादरलं आहे. मित्रासोबत दुचाकीवरून फिरण्यासाठी गेलेल्या तरुणीवर सहा जणांकडून सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या संतापजनक घेनेनं पालघर जिल्हा हादरला आहे.
पालघरच्या तलासरी पोलिस ठाणे हद्दीतील ही घटना असून पीडित मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. मिळासोबत महामार्गावर उभं असताना दोन बाईकवरून आलेल्या सहा जणांनी एका बंद पडलेल्या डाक बंगल्यात नेत 19 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचं तक्रारीत नमूद केलं आहे.या प्रकरणी तलासरी पोलिस ठाण्यात सहा आरोपीं विरोधात गुन्हा दाखल असून तीन आरोपींना अवघ्या काही तासात अटक करण्यात आली आहे. तर, इतर तीन आरोपी फरार असून आरोपींचा शोध सुरू आहे.
19 वर्षीय तरुणीने पोलिसांत तक्रार दिली की, ती तरुणी तिच्या मित्रासह दुचाकीवरून फिरायला गेली होती, खामगाव येथे त्यांची दुचाकी स्लीप झाल्याने ते खाली पडले. त्याचवेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तीन इसमांनी तरुणीच्या मित्राला दमदाटी करून हाकलून लावले. त्यानंतर दुचाकीवरील तिघांनी आणखी तिघांना बोलावून घेतले. तसेच, पिडित तरुणीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून खामगाव जवळील एका बंद डाक बंगल्यावर नेले, या बंगल्याच्या कट्यावर सहा जणांकडून तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला, अशी फिर्याद तलासरी पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी देखील तप्तरेतेने तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींच्या विरोधात बीएनएस 70/1 कायद्यान्वये गुन्हादाखल कण्यात आला आहे.
घटनास्थळी पोलिस अधिक्षकांनी भेट दिली असून इतर आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिस निरिक्षक अजय गरूड यांनी दिली आहे.



Comments