top of page

महाराष्ट्रात एक करोड मतांची चोरी- राहुल गांधी

बिहारमध्ये राहुल गांधींची मत हक्क यात्रा! ’ मत चोर खुर्ची सोड ’ च्या घोषणा

बिहारच्या सासाराम येथील सुआरा विमानतळ मैदानावर ‘मत चोरी’ विरोध यात्रेची जाहीर सभा झाली. या सभेला लालू-राबडी आणि तेजस्वी यादव यांच्यासह विरोधी पक्षातील नेते उपस्थित होते. राहुल गांधी यांची ‘मत चोरी’ यात्रा 16 दिवस 20 जिल्हे आणि 1300 किलोमिटरचा प्रवास करणार आहे.


ree

संपूर्ण भारतात, लोकसभा, विधानसभा निवडणुका चोरीला जात आहेत आणि त्यांचा शेवटचा कट बिहारमध्ये एसआयआर करून नवीन मतदार जोडणे, मतदार कापणे आणि बिहार निवडणुका चोरणे आहे. आम्ही त्यांना ही निवडणूक चोरू देणार नाही, अशा शब्दात विरोधी पक्षनेते राहुल गांधीनी भाजपसह निवडणूक आयोगावर हल्ला चढवला. एसआयआर विरोधात राहुल गांधींची बिहारमध्ये ‘मत हक्क यात्रा’ सासाराम येथून सुरू झाली.


सासाराममधील सुआरा विमानतळ मैदानावर जाहीर सभा झाली. या सभेला लालु-राबडी आणि तेजस्वी यादव यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक मोठे नेते त्यात सहभागी झाले. ‘मत हक्क यात्रा’ च्या पहिल्या दिवशी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेही उपस्थित होते. डाव्या पक्षाचे नेत्यांनी यात्रेत सहभाग घेतला. जाहिर सभेत ‘मत चोर गादी सोड’ चे नारे देण्यात आले.


राहुल गांधी म्हणाले की, आम्ही चौकशी केली तेव्हा सर्व रेकॉर्ड बाहेर काढण्यात आले. कर्नाटकातील एका विधानसभेत एक लाखाहून अधिक मते चोरीला गेल्याचे आम्हाला आढळले. आणि या मतांमुळेच कर्नाटकातील लोकसभा जागा भाजपने जिंकली. जेव्हा आम्ही पत्रकार परिषदेत हे सांगितले तेव्हा निवडणूक अयोगाने आमच्याकडे प्रतिज्ञापत्र मागितले. भाजपच्या लोकांकडून प्रतिज्ञापत्रे मागितली जात नाहीत.


ही संविधान वाचवण्याची लढाई आहे. भाजप- आरएसएस संपूर्ण देशात संविधान मिटवण्याच्या तयारीत आहेत. जिथे जिथे निवडणुका होतात तिथे तिथे ते जिंकतात. महाराष्ट्रातील जनमत चाचण्या म्हणत होत्या की महाविकास आघाडी जिंकेल. लोकसभेत महाविकास आघाडी जिंकते, पण चार महिन्यांत आपण त्याच भागात हरतो. जेव्हा आम्ही चौकशी केली तेव्हा आम्हाला आढळले की 1 कोटी नवीन मतदार जादूने तयार केले गेले आहेत. जिथे जिथे हे नवीन मतदार आले तिथे भाजप युती जिंकली. आम्ही एकही मत गमावले नाही. परंतु भाजपला सर्व नवीन मते मिळाली आणि ते जिंकले. जेव्हा आम्ही निवडणूक आयोगाला व्हिडिओ दाखवण्यास सांगितले तेव्हा त्यांनी नकार दिला, अशा शब्दात राहुल गांधी यांनी तोफ डागली.


तेजस्वी यादव म्हणाले :

तुमचे मत चोरीला जात नाही. तर ते लुटले जात आहे. बिहार लोकशाहीची जननी आहे, आम्ही येथून मतदानाचा अधिकार संपू देणार नाही. तेजस्वी आणि राहुल जोडी लोकशाही संपू देणार नाही. आज ते मतदार यादीतून नावे काढून टाकत आहेत. उद्या ते पेन्शन आणि रेशनकार्डमधून नावे काढून टाकतील. बिहारमध्ये मतदान अधिकार यात्रा सुरू केल्याबद्दल मी राहुल गांधींचे आभार मानतो.


लोहिया जी म्हणायचे की मतदानाचा अधिकार म्हणजे दुखापत करण्याचा अधिकार. हा अधिकार आमच्याकडूनही हिरावून घेतला जात आहे. अनेक जिवंत लोकांची नावे वगळण्यात आली. त्यांना सांगण्यात आले की ते मृत आहेत. आम्ही जिवंत लोकांची नावे सर्वोच्च न्यायालयात पाठवली, त्यांना सांगण्यात आले की त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे. निवडणूूक आयोग मोदींजींच्या इशार्‍यावर बेईमानी करत आहे.

आयोगाची लूट थांबवण्यासाठी राहुल निघाले - पप्पू यादव

पूर्णिया येथील अपक्ष खासदार पप्पु यादव म्हणाले की, राहुल गांधी यांनी भारतातील लोकांचा आवाज बनण्यासाठी 10 हजार किलोमिटर पायी चालले, ते तरुणांबद्दल बोलतात. राहुल गांधी संविधानाचे रक्षण करण्यासाठी बाहेर पडले आहेत. ते राजकीय लाभ किंवा तोटा घेण्यासाठी बाहेर पडलेले नाहीत. राहुल गांधी द्वेष नष्ट करण्यासाठी, निवडणूक अयोगाची लूट थांबवण्यासाठी शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी आणि तरूणांच्या रोजगारासाठी बाहेर पडले आहेत.

Comments


bottom of page