महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती?, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
- Navnath Yewale
- 2 days ago
- 2 min read

नवीदिल्ली: राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक ठरल्याप्रमाणे होईल असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणुकीवर कोणतीही स्थगिती आणलेली नाही. निवडणुकीत आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यात आली असून 15 जिल्ह्यांमध्ये सरपंच आरक्षणातही 50 टक्क्यांचा निकष पाळण्यात आलेला नाही असा अक्षेप नोंदवण्यात आला आहे. यासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. 21 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने आम्ही तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी करू असं सांगितलं आहे.
तेलंगणात 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यात आली असल्याने,उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आणि राज्य निवडणूक आयोगाने तेथील निवडणुकांना स्थगिती दिली. महाराष्ट्रातही मर्यादा ओलांडण्यात आली असल्याचे, निवडणुकांवर स्थगिती येणार का? याकडे सर्वांच लक्ष होतं. मात्र, सुप्रीम कोर्टाने राज्यातील निवडणुकीला स्थगिती दिली नसल्याने ठरल्या वेळेत पार पडणार आहेत.
सुप्रीम कोर्टात सुनावणीदरम्यान काय घडलं?
वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंग : बांठिया आयोगाच्या अहवालावर आम्ही आक्षेप घेतो कारण त्याचा हेतू ओबीसींची संख्या कमी करणे हा होता आणि फक्त आडनाव विचारात घेतले गेले होते.
सरन्यायाधीश सूर्यकांत: आज आपल्याकडे एक बेंचमार्क आहे.. बांठिया आयोग. आम्ही ते वाचलेले नाही पण आता कदाचित त्याकडे गंभीरपणे पाहावे लागेल.
जयसिंग: अवमान हा पुनवरावलोकन मागणचा छुपा मार्ग आहे.
सरन्यायाधीश: येथे आदेशाचाा अर्थ लावला जातो किंवा त्याचा चुकीचा अर्थ लावला जातो हा वाद आहे.
आम्ही जानेवारीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत 3न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी करू
वरिष्ठ वकील विकास सिंह: तर तोपर्यंत निवडणुका होऊ देऊ नका.
सरन्यायाधीश: आम्ही म्हणणं ऐकलं आहे. मागील सुनावणीत दिलेल्या आदेशाच्या संदर्भात, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने एक संक्षिप्त नोंद सादर केली होती. फक्त 40 नगरपरिषदा आणि 17 नगरपंचायत आहेत जिथे आरक्षण 50 टक्क्यांहून अधिक आहे. जे मुद्दे निर्माण होऊ शकतात ते विचारात घेऊन जानेवारी 2026 च्या दुसर्या आठवड्यात 3 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर प्रकरण सूचीबद्ध करांव. दरम्यान, नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुका अधिसूचित वेळापत्रकानुसार होऊ शकतात परंतु वरील 40 आणि 17 चे निकाल या कार्यवाहीच्या अंतिम निकालाच्या अधीन असतील.



Comments