महावितरणची महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
- Navnath Yewale
- Apr 21
- 1 min read

बीड: बीड जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण वाढत आहे. लाचखोरीमध्ये महिला अधिकारी अपवाद नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे गेवराई तालुक्यात ग्रामसेवकाला लाच धेताना रंगेहात पकडल्याची घटना ताजी असतानाच अवघ्या 24 तासात आष्टी येथे महिला सहाय्यक अभिंता एबीबीच्या जाळ्यात अडकल्याने जिल्ह्याच्या प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
या कारवाईमुळे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे की बीड जिल्ह्यात लाच मागण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. कोणत्याही शासकीय निमशासकीय कार्यालयात पैसे दिल्याशिवाय काम होत नसल्याच्या तक्रारी देखील आहेत. लाच मागण्यांमध्ये महिला कर्मचारी अधिाकरी देखील मागे नाहीत हे या कारवाईवरुन सिद्ध होत आहे.
मंगळवारी (दि.21) आष्टी येथील महावितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंता कोमल शिंदे यांना 18 हजार रुपयसांची लाच स्वीकारताना बीडच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागने (एसीबी) ने रंगेहात पकडले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तक्रारदाराच्या सोलर प्रकल्पाची पडताळणी करून देण्यासाठी शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडे 18 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर सापळा रचण्यात आला.
तक्रारदार यांचेकडून लाचेची रक्कम स्वीरण्यासाठी वेळ ठरली, त्यानुसार ठरलेल्या वेळेत खात्रीकरुन एसीबीने सापळा रचला आणि तक्रारदार यांचेकडून 18 हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारताना महावितरणच्या सहाय्यक अभियंता कोमल शिंदे यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
दरम्यान मागील दोन महिन्यापासून लाचखोरावर होत असलेल्या सलग कारवायांमुळे महावितरणसह शासकीय विभागांत खळबळ उडाली असून एसीबीकडून पुढील तपास सुरु आहे. याकारवाईमध्ये मच्छिंद्र बीडकर, अमोल खरसाडे, प्रदीप सुरवसे, अंबादास पुरी यांनी सहभाग घेतला.



Comments