top of page

महिला भक्तावर अत्याचार; करमाळ्याच्या भोंदू भोसले महाजरांना बेड्या

सोलापूर : पश्चिम महाराष्ट्रात स्वत:ला संत बाळूमामाचा आणि आता दत्तभक्त म्हणून मिरवणार्‍या करमाळ्यातील मनोहर भोसले या भोंदू महाराजाला बेड्या ठोकल्या आहेत. भोंदू भोसले याला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून अटक केली आहे.

एका महिला भक्ताच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी सोलापूरच्या करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्यानंतर पोलिसांनी फसवणूक प्रकरणी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भक्तांकडून पैसे उकळल्याप्रकरणी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, त्या अनुषंगाने ही करावाई करण्यात आली आहे. मनोहर भोसले याचा करमाळा तालुक्यात आणि कर्नाटकातील गाणगापूर येथे मठ व मंदिर आहे.


या ठिकाणी तो मोठी रक्कम घेऊन भविष्य पाहतो आणि मार्गदर्शन करतो, तसेच अडचणीत असलेल्या लोकांच्या समस्या सोडवण्याचे उपाय सांगून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळतो. त्याच्याकडे अनेक बड्या व्यक्तींचा राबता असतो, काही प्रसिद्ध राजकीय नेत्यांच्या तो संपर्कात असल्याचे फोटोदेखील व्हायरल झाले होते.


यापूर्वी 2021 मध्येदेखील बारामतीतील एका युवकाच्या वडिलांच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन, ‘ थायराईड कॅन्सर’ बरा करतो असे सांगून बाभळीचा पाला व भंडार्‍याच्या नावाखाली त्याने अडीच लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केली होती. तसेच एका महिला भक्ताच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी सोलापूरच्या करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणत आला होता. या फसवणूक व गुन्हेगारी प्रकरणांमुळेच पोलिसांनी त्याला आता ताब्यात घेतले आहे.

Comments


bottom of page