top of page

माजीमंत्री धनंजय मुंडेंना मुंबईतील सरकारी बंगला सुटेना?

मुंबईतील घर राहण्यायोग्य नाही, भाड्यानं घर मिळणंही कठीण धनंजय मुंडेंनी सातपुडा न सोडण्याचं दिलं कारण, सामाजिक कार्यकर्त्या अंजलि दमानियांचा संताप 48 तासात सातपुडा सोडा अन्यथा सरकारला कायदेशीर नोटीस, करुणा मुंंडेंची धनंजय मुंडेंना ऑफर

ree

राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या आडचणी काही कमी होताना दिसून येत नाहीत. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संताष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील घडामोडीनंतर धनंजय मुंडेना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. विशेष म्हणजे महायुती सरकारच्या पहिल्या अधिवेशनाच्या दुसर्‍याच दिवशी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला. मात्र, राजीनाम्याला सहा महिने उलटूनही त्यांनी अद्याप सातपुडा हे मंत्र्यासाठीचे निवास्थान सोडले नाही.


त्यामुळे धनंजय मुंडेवर सरकार मेहबान का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे मुंबईत आपल्याला कुठेही घर नसल्यानं बंगला सोडला नसल्याचे स्पष्टीकरण मुंडेंनी माध्यमांशी बोलताना दिलं होतं. त्या संदर्भात, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी सरकारला कायदेशीर इशारा दिला. त्यानंतर, आता धनंजय मुंडेंनी आपली बाजू मांडत मुंबईतील घराच्या डागडूजीचे काम सुरू असल्याने सातपुडा बंगला न सोडण्याचे कारणही दिलं आहे.


मुंबई शहरातील सातपुडा हे शासकीय निवास्थान मी रिक्त केले नसल्याबाबत माध्यमांध्ये वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. मुंबईतील माझी सदनिका सध्या राहण्यायोग्य नसून, त्याठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू आहे. याशिवाय माझ्या लहान मुलीची शाळा याच भागात असून माझ्या विविध आजारांवरील उपचारार्थ देखील मला मुंबईत राहणे गरजेचे आहे. मात्र, या परिसरात तातडीने भाड्याने घर मिळणे सध्या कठीण आहे.


माझा शोधही सुरू आहे. असे स्पष्टीकरण आमदार धनंजय मुंडे यांनी दिले आहे. तसेच, माझ्या सदनिकेचे काम पूर्ण होताच मी शासकीय निवास्थान रिक्त करणार असून, तशी शासनाकडे विनंती देखील केली आहे, अशी माहितीही धनंजय मुंडेंनी दिली.

दरम्यान, गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये धनंजय मुंडेंनी मुंबईतील गिरगाव चौपाटीवर असलेल्या घराचा उल्लेख केलेला आहे. हे घर सध्या वापरामध्ये नाही, अशी माहिती आहे, मात्र, सातपुडा बंगला न सोडल्याने धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या असून विरोधकांकडूनही टीका होत आहे.


अंजली दमानियांचा इशारा:

धनंजय मुंडे जेव्हा सरकारी बंगला वापरत होते तेव्हा ते पहिल्यांदा म्हणाले होते की, माझं मुंबईत घर नाही आणि मला तब्येतीमुळे आणि मुलीच्या शिक्षणामुळे मुंबईत राहणं गरजेचे आहे. तेव्हा देखली आपण म्हटलं होतं की त्यांनी घर भाड्यावर घेऊन राहवं. पण आता कायद्याप्रमाणे त्यांना सातपुडा बंगला खाली करणे भाग आहे, क्रमप्राप्त आहे, असे अंजली दमानिया म्हणाल्या. तसेचं, अत्ताच्या घटकाला आपल्याला दिसतंय की त्यांच्या 2024 च्या एफिडेबिटवर वीरभवन नावाची एक बिल्डिंग आहे.


जिथे 902 नंबरचा फ्लॅट म्हणजे 2151 स्क्वेअर फूटच्या बहूतेक तो चार बेडरूमचं घर असावं, तोच फ्लॅट मंत्री असताना देखील होता, अशी माहितीही दमानिया यांनी दिली. जर 48 तासात ते बंगला खाली करत नसतील आणि 46 लाखाचा आत्तापर्यंत थकबाकी असलेले दंड आहे तो देखील देत नसतील तर आम्ही सरकारला प्रश्न करू, हा दंड देखील वसूल करण्यात यावा आणि तातडीने मुंडे यांची रवानगी त्यांच्या घरी करण्यात यावी. 48 तासात त्यांनी ते घर खाली करावं, असा इशाराही अंजली दमानिया यांनी दिला आहे.



करुणा मुंडेंची धनंजय मुंडेंना ऑफर:


करुणा मुंडे म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांचे मुंबईत तीन ते चार घर आहेत. पवई, मलबार हिल, आणि सांताक्रूझमध्येही. जर धनंजय मुंडेंना घर नसेल तर त्यांनी त्यांच्या दुसर्‍या पत्नीसोबत माझ्या घरी यावे. मी त्यांना माझ्या घरात घेईल. पुढे त्या बोलाताना म्हणाल्या की, धनंजय मुंडेंसाठी 42 लाख रुपयांचा दंड काहीच नाहीये. धनंजय मुंडे पुन्हा कधीही मंत्री होणार नाहीत, त्यांना त्यांचे आमदारपदही गमवावे लागणार आहे.

Comments


bottom of page