मालेगाव चिमुरडी हत्या प्रकरण: नराधम आरोपीची कोठडीत भयान अवस्था
- Navnath Yewale
- 2 days ago
- 2 min read

नाशिक: जिल्ह्यातील मालेगावमधील मालेगाव चिमुरडी बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र हादरून गेला. या प्रकरणी नराधम विजय खैरनार हा सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे. मागील 11 दिवसांपासून त्याला सुरक्षेच्या काणास्तव शहरातील वेगवेगळ्या पोलिस कोठडीत ठेवलं जात आहे. आपण केलेल्या कृत्यामुळे विजय हा आता भानावर आला आहे. आपल्या हातून घडलेल्या कृत्यामुळे त्याची झोप उडाली आहे.
मालेगावमधील डोंगराळे गावात 4 वर्षाच्या चिमुरउीवर अत्याचार करून निर्घुणपणे खूून करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी विजय संजय खैरनार हा पोलिसांच्या कोठडीत आहे. मालेगाव जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला 11 दिवसाच्या पोलिस कोठडीत त्याची रवानगी केली आहे. कोठडीत असताना विजय पुरता हादरून गेला आहे. मागील 11 दिवसांपासून त्याला शहरातील वेगवेगळ्या पोलिस कोठडीत ठेवण्यात आलं आहे. त्यावेळी त्याला इतर आरोपी सारखंच जेवण दिलं जात आहे, त्याला इतर आरोपीसारखच वागवलं जात आहे. आपल्या हातून घडलेल्या सैतानी कृत्यामुळे आरोपी विजय आतून हादरून गेला आहे. त्याला आता धड झोप येत नाही रात्रीच तो उठून बसतो, अशी माहिती समोर आली आहे. याबद्दलचं वृत्त प्रकाशीत करण्यात आलं आहे. आरोपी विजय हा 24 वर्षाचा असूनही अशिक्षित असल्याचं समोर आलं आहे. त्याला फक्त स्वत:च नांव लिहिता येतं. आता अपाल्याला कठोर शिक्षा होणार आहे, याची त्याला जाणीव झाली आहे. ते त्याच्या चेहर्यावरून दिसून येत आहे. अशी महिती अधिकार्यांनी दिली.
या नराधमाने चिमुरड्या मुलीवर आधी अत्याचार केले होते. त्यानंतर कंबरेच्या करदोड्याने तिचा गळा आवळून खून केला. तिचा मृत्यू झाला आहे असं समजून त्याने तिचा मृतदेह झुडपात फेकून दिला होता. घरात कुणी आलं तर त्याच्या हाती काही लागेल या भीतीपोटी त्याने सगळं घर धुवून काढलं होतं. पुरावे कुणाच्या हाता लागू नये म्हणून त्याने घरात साफसफाई केली होती. पण,पोलिसांनी चिमुरडीचं शवविच्छेदन केलं यामध्ये चिमुरडीवर अत्याचार झाला आणि गहा दाबून खून केला. तसंच डोक्याला गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाल्याचं अहवालात स्पष्ट झालं. पोलिसांनी याबद्दलचे सगळे पुरावे गोळा केले आहेत. त्यामुळे नराधम हा फासापर्यंत जाईल, असं अधिकार्यांनी विश्वासाने सांगितलं.
दरम्यान 27 नोव्हेंबरला मालेगाव जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली. यावेळी लोकांचा संताप लक्षात घेता आरोपीला कोर्टात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आलं. कोर्टामध्ये ही त्याची तिसरी उपस्थिती होती. गुन्ह्यात वापरलेले शस्त्र जप्त करण्यासाठी सरकारी वकिलांनी 4 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. तर संशयिताच्या वकिलांनी अटक बेकायदेशीर असल्याचा दावा केला होता. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत आरोपीस 1 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.



Comments