मालेगावात शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेला यश मनपातील उपमहापौरांच्या दालनातून टिपू सुलतानचा फोटो हटवला
- Navnath Yewale
- 7 hours ago
- 1 min read

मालेगाव : शहरातील उपमहापौरांच्या दालनात लावण्यात आलेल्या टिपू सुलतान यांच्या फोटोबाबत सुरू झालेल्या वादाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. हिंदुत्ववादी संघटना व शिवसेना यांच्या आक्रमक भूमिकेनंतर अखेर सबंधित फोटो हटवण्यात आल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.
“ ज्यांनी टिपू सुलतान याच्याबद्दल विशेष आपुलकी असेल, त्यांनी त्यांच्या घरात मोठा अल्बम लावावा” अशी प्रतिक्रिया सोशल मिडियावर व्यक्त होत आहे. देव, देश, धर्म आणि शहराच्या विकासासाठी नागरिकांनी सजग व सक्रिय राहावे, असे आवाहनही यानिमित्ताने करण्यात आले आहे. हा विषय सोशल मिडियावर चांगलाच तापल्यानंतर मालेगाव महानगरपालिकेतील शिवसेनेचे पदाधिकारी आणि सर्व 18 नगरसेवकांनी या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त केला. फोटो तातडीने हटवण्यात यावा, अशी मागणी थेट महानगरपालिका आयुक्तांकउे करण्यात आली होती. शहरातील शांतता, कायदा सुव्यवस्था आणि नागरिकांच्या भावना लक्षात घेता प्रशासनाने शिवसेनेची भूमिका मान्य करत फोटो काढण्याचे आदेश दिले.

या प्रकरणात काहींनी “ शिवसेनेचे नगरसेवक काय करत आहेत?” असा सवाल उपस्थित केला होता. मात्र टीकेला उत्तर देण्याऐवजी शिवसेनेने थेट आयुक्तांना जाब विचारत विषय मार्गी लावला. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात भारतीय जनता पार्टी मवाळ भूमिका घेताना दिसून आली.
शिवसेनेचे गटनेते श्री. निलेश दादा आहेर तसेच पदाकिधारी श्री. निलेश दादा आहेर तसेच पदाकिधारी श्री. संजय दुसाने व श्री.विनोद वाघ यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले की, “ अनेक थोर महापुरुषांचे फोटो उपलब्ध असताना केवळ टिपू सुलतान याचाच फोटो लावणे म्हणजे हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याचा आणि शहरात हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. संविधानिक पदांवरील दालनांमध्ये केवळ सर्वमान्य महापुरुषांचेच फोटो असावेत, हीच शिवसेनेची ठाम भूमिका आहे”
सामाजिक व राजकीय पातळीवर वाढलेली चर्चा लक्षात घेऊन अखेर टिपू सुलतान यांचा फोटो हटवण्यात आला असून, यामुळे शिवसेनेच्या भूमिकेला यश मिळाल्याचे मानले जाते आहे.



Comments