‘ मी अंधभक्त नाही, देशभक्त आहे’ सोनम वांगचुक, अभिजीत दिपकेंच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरेंचे मुंबईत आंदोलन
- Navnath Yewale
- 1 day ago
- 2 min read

मुंबई: शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून आज मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक नेते सहभागी होते. सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या समर्थनार्थ आयोजीत आंदोलनामध्ये पक्षकार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकही सहभागी झाले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
नीटपेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या वतिने सोनम वांगचुक, अभिजीत दिपके यांनी 20 जून पासून आंदोलन सुरू आहे. सोनम वांगचुक यांनी गेल्या विस दिवसांपासून उपोषण सुरू केले काल अचानक दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना उपचारार्थ रुग्णालयात हलवलं.
सोनम वांगचुक यांना हलवल्यानंतर अभिजीत दिपके यांनी आंदोलन कायम ठेवत अन्नत्याग आंदोलन सुरू केले. शिवाय उद्या दि.20 संसदेवर मोर्चाची घोषणा केली असून त्यांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. उद्धव ठाकरे यांनीही या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला असून आंदोलनाच्या समसर्थनार्थ त्यांनी शिवाजीपार्क परिसरात आंदोलन केले. यावेळी, खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे, पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्यासह पक्षाचे अनेक नेते व सामान्य नागरिक सहभागी झाले होते.
उपस्थितांना संबोधीत करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी काल नागपूरात होतो . तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं केंद्र आहे. या संघाच्या होसबळेने कालच्या मे महिन्यात स्टेटमेंट दिलं. पाकिस्तानसोबत चर्चा केली पाहिजे. जो पाकिस्तान आतंकवादी घुसवतो. हल्ले करतो त्याच्याबरोबर चर्चेचे दरवाजे खुले ठेवले पाहिजे. भागवतांना विचारलं तर म्हणतात बरोबर आहे. हम हिटलर जैसे नही है. आहे भागवत साहेब हिटलर सारखे नाही हे मोदींना सांगा. पाकिस्तानासोबत चर्चेची तयारी आहे. मग वांगचुकसोबत का नाही करत? जो देश सैनिकांचे बळी घेतो त्याच्याशी चर्चा. आणि जो माणूस सैनिकांसाठी सोलार टेंट बनवतो त्याच्याशी चर्चा नाही. अशी माणसं मिळत नाही. एवढा फौज़फाटा का आणताय? पाक व्याप्त काश्मीरात घुसवा या फौजा.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काही जण विचारातात मेलोडी खाओ खुद जान जाओ. फिर मुझे बात करने की क्या बात है. मेलडी खाओ और खुद जान जाओ, तिकडे चॉकलेटच्या गोळ्या आणि आमच्या तरुणांना बंदुकीच्या गोळ्या. आम्ही देशभक्त आहोत. हिंदू आहो. शेंडी जाणव्याचे हिंदू नाही. म्हणून भागवतांना विचारलं जे आज देशात सुरू आहे हे तुमच्या कल्पनेतील हिंदु राष्ट्र चालतं का. हे हिंदु राष्ट आहे? आम्हाला हे हिंदू राष्ट्र मान्य नाही.
आता एक पोस्टर होतं, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. ही शुल्लक गोष्ट आहे, हे पण एकदम शुल्लक आहे. हा लढा आता सरकार आपल्याला रोजी रोटी देऊ शकत नाही, रोजगार, शिक्षण देत नाही. उत्तर देत नाही. हे सरकार बदलण्याचा लढा सुूरू झाला पाहिजे. धर्मेंद्र प्रधान नको सरकारचं बदलायचं आहे . मी नेतृत्व करायला आलो नाही. नेते व्हा सांगायला आलो आहे. एकच वचन द्या ही आग सरकार बदलेपर्यंत टिकली पाहिजे. सरकार टिकता कामा नये, या आगीत सरकार भस्म झालं पाहिजे.’ असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.



Comments