मुंबई पोलिसांचा विसर्जनसाठी चोख बंदोबस्त; पहिल्यांदाच एआयचाही वापर
- Navnath Yewale
- Sep 5
- 2 min read

महाराष्ट्रासह मुंबईत उद्या (6 सप्टेंबर) लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येणार आह . दक्षिण मुंबईतील चौपाटीवर गणपती बप्पाच्या विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात नागरकि येत असतात. मुंबईतील गणपती विसर्जनासाठी मुंबई पोलिस सज्ज झाले आहेत. आज सह पोलीस आयुक्त ( कायदा आणि सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी आणि सह पोलिस आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे यांनी पत्रकार परिषद घेत गणपती विसर्जनाबाबत माहिती दिली.
मुंबईमध्ये गणपती विसर्जनाच्या वेळी वाहतूक आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिस सज्ज आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि वाहतूक पोलिसांची तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन व इतर तंत्रज्ञानाचा वापर करून विसर्जन मिरवणुकींवर आणि गर्दीवर बारीक लक्ष ठेवले जातणार आहे. सुरक्षेसाठी विशेष नाकेबंदी, नियंत्रण कक्ष आणि आपत्कालीन पथके तयार करण्यात आले आहेत.
बंदोबस्तात पहिल्यांदाच एआयचा वापर
विसर्जनाची पूर्ण तयारी मुंबई पोलिसांनी केली आहे. रस्ते, चौपाटी, वाहतूकीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. घरगुती गणेश विसर्जन, मंडळातील मोठ्या गणपती मूर्तीच्या विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून चौपाटीच्या ठिकाणी बीएमसी, स्वयंसेवक असतील. प्रत्येक ठिकाणी कडेकोट बंदोबस्ताचं नियेाजन केल्याची माहिती मुंबई पोसिलांनी दिली. मुंबईत 10 हजार कॅमेरे लावण्यात आले आहेत. ड्रोनद्वारे देखील सर्व विसर्जनावर नजर ठेवण्यात येणार आहे. पोलिसांच्या पेट्रोलिंगच्या गाड्या असतील. कंट्रोल रुम देखील सज्ज आहे. पोलिसांनी दिलेल्या सर्व सूचनाचं पालन करा, असं आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आलं आहे. तसेच यंदा पहिल्यांदाच मुंबई पोलिसांकडून बंदोबस्तात एआयचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.
सह पोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी म्हणाले की, गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात आला आहे. महापालिकेसोबत मिळून आम्ही बंदोबस्त आखला आहे. 6500 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत. दीड ते दोन लाख घरगुती गणपती मुंबईत आहेत. 65 नैसर्गि विसर्जन स्थळ आहेत. 205 कृत्री तलाव आहेत. तसेच विसर्जन मार्गावरील रस्ते मोकळे करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेर्यातून मुंबईवर लक्ष ठेवलं जाणार आहे. 12 अतिरिक्त पोलिस आयुक्त, 40 डीसीपी, 61 एसीपी यावेळी बंदोबस्तात तैनात असतील. सोबत 3000 अधिकारी आणि 18,000 पोलिस कर्मचारी देखील तैनात असतील. सोबत राज्य राखीव पोलिस दलाच्या 14 तुकड्या, चार शीघ्र कृती दलाच्या तुकड्या तीन दंगल नियंत्रण पथकाच्या तुकड्या आणि बीडीडीएस ला देखील सज्ज ठेवण्यात आले आहे. 10,000 सीसीटीव्ही कॅमेरातून विसर्जनावर लक्ष ठेवलं जाईल. तसेच ड्रोन कॅमेर्याने नजर ठेवली जाईल. एआय चा देखील मुंबई पोलिस बंदोबस्ताकरीता वापर करणार आहेत. परवानगी शिवाय ड्रोन उडवण्यास बंदी असणार आहे. साध्या वेशातील पोलिस देखील तैनात असतील. दहशतवाद विरोधी उपाययोजना देखील घेण्यात आल्या आहेत.
सह पोलिस आयुक्त अनिल कुंभारे म्हणाले की, वाहतुकीसाठी नियेाजन करण्यात आलं आहे. गिरगाव चौपाटी तसेच दादर चौपाटी, जुहू येथे वाहतूकव्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. बंदोबस्तासाठी 4 पोलिस उपायुक्त तसेच 2826 वाहतूक पोलिस कर्मचारी तसेच टप्याटप्याने रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबईत 12 पूल धोकादायक आहे सावधगिरीचं आवाहन करण्यात आलं आहे. गर्दीची 52 ठिकाणं ओळखण्यात आली असून वाहतूक नियमनासाठी टॉवर उभारण्यात आले आहेत. तसेच 520 सुरक्षा रक्षक समुद्रकिनारी तैनात करण्यात आले असून कोस्टगार्डची देखील मदत घेण्यात आली आहे.
गणपती विसर्जनासाठी तीन हजार अधिकारी, 18 हजार कर्मचारी तैनात करण्यात आले असून विसर्जनासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


Comments