top of page

मुंबईचा महापौर कोण? सस्पेन्स कायम शिवसेना ठाकरे महापौर, उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार!


मुंबई: राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई (बीएमसी) महापालिकेच्या महापौरपदी अखेर 11 फेब्रूवारीला पदभार स्वीकारला जाणार आहे. तर 7 फेब्रूवारीला अर्ज भरण्याची तारीख आहे. मात्र, ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. कारण ठाकरेंची शिवसेना महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देण्याचा विचार करत आहे.


तशा प्रकारची चर्चा ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आणि काही अनुभवी नगरसेवकांमध्ये झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातला सहयोगी गटासंदर्भातला निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे, मुंबईया महापौरपदाची निवडणूक लक्षवेधी आणि चर्चेत आहे. तुम्हाला लवकरच समाजेल असेक म्हणत सस्पेन्स कायम ठेवला आहे.


मुंबई महापालिकेच्या निकालानंतर मुंबईचा महापौर कोणत्या पक्षाचा होणार यावरुन चर्चा सुरू होती. त्यावेळी, देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर होईल, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केल्यामुळे महापौरच्या निवडीची जोरदार चर्चा रंगली. आता महापौरपदाचे आरक्षण सोडत जाहीर झाल्याने भाजपचा महापौर होईल हे जवळपास निश्चित मानले जाते. मात्र, शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार देण्यात येणार असल्याचे महापौरपदाचा सस्पेन्स वाढला आहे.


आम्ही उमेदवार देणार की नाही हे तुम्हाला लवकरच समजेल, मी त्याच्याबद्दल आता बोलणार नाही. बीएमसीची निवडणूक होऊन गेली आहे. आता जे महत्वाचे विषय आहेत त्याच्यावर फोकस करणे गरजेचे आहे. राजकीय विषय बाजूला ठेवा, आमच्या पक्षाची लोक कामाला लागली आहेत. असे म्हणत आदित्य यांनी बीएमसी महापौर निवडणुकीचा सस्पेन्स वाढवला आहे.


प्रवाशांना हेलिकॉप्टरमधून मदत झाली असती : मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे ट्रॅफिक जामसंदर्भाृतही अदित्य ठाकरे यांनी भूमिका मांडली आहे. पत्र वगैरे न देता मुख्यमंत्र्यांनी या सगळ्यावर आदेश द्यायला पाहिजेत. एमएसआरटीसी कोणाकडे आहे, तुम्हाला माहिती आहे. त्यांच्यामुळे ते मुख्यमंत्र्यांचं ऐकत

Comments


bottom of page