top of page

मुंबईत श्रेय चोरणारी टोळी, यात अबोल बालकांचाही समावेश- मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराला आज सुरूवात झाली. वरळीत महायुतीची प्रचार सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर सडकून टीका केली. काही लोक आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेत आहेत असा आरोप करताना मुख्यमंत्र्यांनी केला आहे. तसेच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंचा उल्लेख अबोध बालके असा केला. तसेच इतरही अनेक मुद्यांवरून ठकारेंवर निशाना साधला.


प्रचार सभेला संबोधीत करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आज मुंबईत महायुतीच्या प्रचाराचा नारळ आपण फोडला आहे, आज तिथीने आई जिजाऊंची जयंती आहे. आई जिजाऊंनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवछत्रपतींना तयार केलं होतं. आज क्रांतिज्योती सावित्रिबाई फुलं यांचीही जयंती आहे. या खास दिवशी प्रचाराला सुरुवात करत आहोत.


14-15 ही संक्रमणाची तारीख आहे, या दिवशी आपल्याला चमत्कार घडवायचा आहे. ही निवडणुक मुंबईच चित्र आणि मुंबईकरांचं जीवन बदलण्याची आहे. आता दाणा पाणी वाल्यांनी त्यांचा ठिकाणा कुठे आहे ते दाखवायचं आहे. मी मुंबईमध्ये उतरत होतो तेव्हा मुंबई कुठे गेली का? कुठे सरकली का हे पाहत होतो. मात्र मुंबई कुठे गेलेली नव्हती. मुंबई सरकत नाही, निवडणुक आली की काही लोकांना वाटतं मुंबई उत्तरेकडे सरकते. मुंबई नव्हे तुमची बद्धी सरकत आहे.


पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई तोडण्याची हिंमत कुणाच्या बापात नाही. बाळासाहेब ठाकरेंचा ढाण्या वाघ एकनाथ शिंदे आमच्या सोबत आहेत. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आपल्याकडे आहे. मुंबईकर जागा झाला आहे. ठाकरे एकत्र आलेत, आता तुमचं काय होणार, तुम्ही कसं लढणार? असं मला विचारण्यात आलं. देखकर धुंदलीसी ताकद हौसला हमारा कम नही होता; झुटी आँधियोंसे वही डरे जिन चिरागों मे दम नही होता.


मला तर आता लक्षात आलं आहे की, मुंबईमध्ये श्रेय चोरणारी टोळी आहे. यात काही अबोध बालके देखील आहेत. ते म्हणतात मुंबइ र्चा विकास आम्ही केला. मात्र मेट्रोचं काम, कोस्टल रोड, बीडीडी चाळ ही कामे आम्ही केली आहेत. मात्र विकासात खोडा घालण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले असा अरोप करत मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.

Comments


bottom of page