मुख्यमंत्री फडणवीसांच्या नातेवाईक महिलेचा न्यायासाठी तीन तपांचा संघर्ष
- Navnath Yewale
- 2 days ago
- 7 min read
मृत्यूपश्चात पतीला न्याय मिळवून देण्याची जरांगे पाटील यांच्याकडून न्यायाची खात्री; माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप

बीड: नागपूर येथील रजनी देशमुख नागपूरकर या गेल्या 29 वर्षापासून न्यायासाठी शासन, प्रशासन दरबारी खेट्या मारत आहेत. पतीच्या नोकरीसाठी पतीच्या निधनानंतर पतीवर लागलेला डाग पुसून हक्काच्या पेन्शनसाठी. जाईल ,तिथ लाखोंनी पैसा ओतून न्याय मिळाला नाही, शेवटी उतार वयात जगण्यासाठी दिलेले पैसे तरी परत मिळावेत या आशेने बीडे येथे आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या नातेवाई (असं त्या महिला म्हणतात) असलेल्या महिलेने जरांगे पाटील यांची भेट घेतली. जरांगे पाटील साहेबच माझे पैसे परत मिळवून देतील आणि मृत्यू पश्चात माझ्या पतीला न्याय मिळवून देतील असा ठाम विश्वास व्यक्त केला.
पोलिस खात्यातील पतीची राजकीय द्वेषापाई विभागीय चौकशी लावून बडतर्फ केले. न्यायासाठी 1997 पासून पती-पत्नींनी मंत्रालयापाससून स्थानिक पोलिस ठाण्यापर्यंतच्या सरकार दप्तरी पाठपुराव केला ढिगभर अर्ज, पुरावे सादर करण्यासाठी शासन प्रशासन दरबारी खेट्या मारल्या, नुसत्या खेट्याच नाही, तर न्यायाच्या अपेक्षेने सरकारी बाबुंचे लाखोंनी हात ओले केले.
प्रशासनाकडून न्याय मिळण्याची आशा धुसर झाल्यानंतर शासनातील आमदार, मंत्र्यांकडंही पदर पसरला पण इथेही पैशाची मागणी. किमान आता तरी न्याय मिळेल या अपेक्षेने दाग, दागीने विकून नातेवाईकांकडून लाखो रुपये गोळा करून दिले पण शेवटी न्याय मिळालाच नाही, शेवटी न्यायाच्या प्रतिक्षेत 2020 मध्ये पती दगावले. मात्र, पतिच्या छळ आणि मृत्यूस कारणीभूत असलेल्यांना सरळ सोडणार ती पत्नी कसली, उतारवयातही धडधाकट तरुणाईला लाजवेल अशा अन्यायाने पेटून उठलेल्या वृद्ध रंजना नागपूरकर या महिलेने मृत्यू पश्चात का होईना पतीला न्याय मिळवून देण्यासाठी थेट बीड गाठलं.
चार दिवस बीडला मुक्काम ठोकून लोकप्रतिनिधींच्या भेटी घेतल्या. मात्र, काही झालं तरी न्याय मिळवणारचं इर्षेने पेटलेल्या रंजना नागपूरकर यांनी थेट अंकुश नगर (महाकाळा) गाठला आणि जरांगे पाटील यांची भेट घेवून आपलि कैफियत मांडली. जरांगे पाटील यांनी यांनी मुलाप्रमाणे ‘ आता तुम्ही काहीच करू नका मी बघतो न्याय कसा मिळत नाही ’ एवढा शब्द देवून त्यांची अस्थावाईकपणे आपुलकीचे चौकशी करत सर्व प्रकरण जाणून घेतले आणि रंजना नागपूरकर (ज्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नात्यातून असल्याचे त्या सांगतात) जरांगे पाटीलच न्याय देऊ शकतात, असा ठाम विश्वासाच देत जरांगे पाटील यांच्या भेटीचे समाधान त्या व्यक्त करतात.
रंजनी देशमुख नागपूरकर यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधत आपली आपबीती मांडली ती जशी च्या तशी, रश्मी शुक्ला यांचा स्टेनो वामन तितरमारे याची बहीण कोणत्या एका खूनाच्या गुन्ह्यात होती. त्याच गावात माझ्या नवरा पोलिस खात्यात नोकरीला होता. तीला वाचवण्यासाठी माझ्या नवर्याची सन 1997 मध्ये विभागीय चौकशी लावून राजकीय द्वेषापाई सुरबुद्धीने त्यांच्यावर बडतर्फची कारवाई केली आणि खात्यातून काढलं. त्यानंतर आम्ही न्याय मागणीसाठी सतत मंत्रालयापासून पोलिस ठाण्यापर्यंत सगळ्या कार्यालयात येरझर्या घातल्या. त्यानंतर कक्षाधिकारी गुंजाळ साहेबांनी आम्हाला न्याय देतो असं म्हटलं पण त्यांनीही आमच्याजवळ पैशाची मागणी केली. पण त्यांना आम्ही दिले नाही आमच्याकडून त्यांनही घेतले नाहीत.
मग ते रिटायर झाले. त्यानंतर देशपांडे साहेबांना भेटलो देशपांडे साहेबही रिटायर झाले. आम्हाला फक्त सुळे साहेब होते त्यांनी न्याय देतो म्हटलं तर माणिकराव ठाकरे चालले गेले. त्यांनी ऑर्डर करून दिली सुळे साहेबांच्या काळात. सुळे साहेबांनी ऑर्डर केला होता की दोषारोपांच्या मानाने केलेली शिक्षा फार कठोर असून दोन वेतन वाढीची शिक्षा देवून पुर्ववत कामावर रुजू करून घेतले . हा आदेश झाल्यानंतर आम्हाला पोलिस डिपार्टमेंटने तो आदेशच पास होवू दिला नाही. परत मी आणि माझा नवरा येरझर्या मारायचो. तर आमचं मंत्रालय पेटलं असं आम्हाला सरळ सांगायचे आता तुमचा कुठलाच कागद नाही. मग आता तुम्ही परत रिअॅप्लीकेशन करा असं म्हणायचे आणि आम्ही परत रिअॅप्लीकेशन करात जयाचो.
मग त्यात आमची भेट झाली कक्षाधिकारी ऋषिकेश कदम याच्याशी. त्यावेळेला ते कमीत कमी नाही म्हटलं तर आठ ते नऊ वर्षे त्याच टेबलवर होते. त्याकाळामध्ये त्यांनी स्पष्ट या भाषेत म्हटलं की, आमचा टेबल हलल्या शिवाय कुठलाच काही प्रकार होत नाही. आकोल्याच्या एका कर्मचार्याचे उदाहरण देत त्याने आमच्याकडे पैशाची मागणी केली. त्याने सरळ दहा लाखाची बोलणी केली. आमच्याकडे एवढे पैसे नाहीत म्हटलं. मग दोन वेळा करून त्याला पाच लाख रुपये जेवनाच्या टिफीनमध्ये घालून दिले. त्याचा नोकर जो मंत्रालयात शिपाई आहे तो टिफीन घ्यायला आला आणि टिफिन घेवून चालला गेला. त्यावेळेला माझा भाचा त्यावेळेला तिथं होता. मरिन ड्राईव्ह पोलिस स्टेशनला त्याचं माझं आमचं सगळ्यांच स्टेटमेंट तिथे झालं.
पण आम्हाला तिथूनही न्याय मिळाला नाही. मग त्याला मी पैशाची मागणी केली. अनिल देशमुखांनी परत त्यांच खातं गेल्यानंतर त्यांनी परत अपिल लावली, दिलिप वळसे पाटलांकडं पण आम्ही गेलो आमची तिथून पण अपिल मंजूर झाली. पण ऋषिकेश कदम याने आम्हाला कुठेच न्याय मिळवून दिला नाही. परत पाच लाखासाठी. शेवटी आमचा निर्णय कुठेच झाला नाही त्याने शिवी घातली माझ्या नवर्याला ‘ लंगड्या म्हणे मरशील या मंत्रालयात’ तर खरच माझा नवरा मुंबईहून परत आल्यानंतर सकाळी आले दुसर्या दिवशीची एकच रात्र गेले तिसर्या दिवशी 13 फेब्रूवारी 2020 ला ते मृत्यूमुखीच पडले. 11 फेब्रूवारीला आम्ही घरी आलो 12 ते घरी राहिले तर वेड्यासारखंच त्यांंचं मनावर मला ऋषिकेशनी शिवी घातली मी त्याला बघतो, बघतो करून ते शेवटी एक्सपायर झाले.
तिरडी उचलल्या नंतर त्यांचा चौदावा झाला 28 फेब्रूवारीला 2020 ला. गोड जेवन सुद्धा होवू दिलंनाही की मी मंत्रालयात गेले पैशाची मागणी करायला तेव्हापासून ते आजपर्यंत मला त्याने मला पैसे दिले नाही. परत अनिल देशमुख साहेबांनी आपल्या खात्यात असताना मी सकाळी माझ्या नवर्याची राख सावडायचीच होती तर मी त्यांच्याकडे रडत गेली आणि म्हटलं झालं हो साहेब गेले. अरे अरे हे कसं झालं म्हणे आणि मग लगेचच त्यांनी धनंजय मुंडेची ओळख करून दिली. त्यावेळेला ते काय आमदार होते काय माहित नाही पण आच्या पक्षाचा आहे, तो काम करेल अशी ओळख करुन दिली. फोटो , अल्बन दाखवून सलील देशमुख, अनिल देशमुख, अमित गायधने यांनी मला धनंजय मुंडेची मुंबईला ओळख घालून दिली.
यामध्ये घ्यायचं द्यायचं ठरलं पैसे. धनंजय मुंडेंनी 25 लाख रुपयांची मागणी केली. पण नव्हते माझ्याकडे एवढे पैसे. पतीचा मृत्य झाला होता, आता तुला भरपूर पेन्शन आणि तुझा 1997 पासून उर्वरित रक्कम तुला मिळवून देतो म्हणून 25 लाख रुपयांची मागणी केली. या लोभाने नातेवाईकांना वाटलं की हा पैसे मिळवून देईल, लहानपणी पोरांनी त्रास भोगला तर आज सुखी होतील बिच्चारे असं वाटलं. तर मी सोन, दाग दागिने इकडून तिकडून काय काय नाही केलं मी. आज माझा सुन, पोरगा नाही सांगू शकत एवढ्या यातून मी त्याला पहिल्या टप्यात आठ व नंतर नऊ लाख रुपये असे एकून 17 लाख रुपये दिले. काम झालं नाही म्हणून मी पैसे परत मागायला धनंजय मुंडे यांच्याकडे परळीला गेले तेव्हा.
धनंजय मुंडेंनी आदेश केला, मला म्हटले हे निखिल फड, कैलास फड आहेत, त्यांची बायोका होती घरी आई होती घरी स्वत: धनंजय मुंडे होते परळीला. त्यांच्या घरी पांढरा असा हॉल आहे. असा झिना आहे तिथे झिन्याच्या बाहेरचं ठेवलं असं बाजूला झाडं वगैरे आहे तिथं उभं ठेवलं आणि ते डबे द्यायला लावले. असे खोके होते तेलाच्या पाकिटचे.
तेलाच्या डब्यात घालून पैसे दिले. आठ लाख पहिले दिले, लगेच नऊ लाख दिले दोन वेळा करून दिले 17 लाख रुपये दिले. सतरा रुपये परत केले नाहीत, बंदुकीची गोळी दाखवली निखिल फड, कैलास फड यांनी. काम झालं नाही म्हणून पैसे परत मागायला गेले होते, माझे पैसे परत द्या नाही तर मी इथून संपल्या शिवाय परत जाणार नाही, असं म्हटलं तर ते म्हणाले की तु काय संपते आम्ही किती ऊसतोडे चे किती आमच्या गावात असे प्रेतं गाडले आम्ही तर तु कुठं लागून गेली. धनंजय मुंडे आणि कैलास फड तो स्वत: म्हणाला किती प्रेतं गाडली म्हणे. आणि लगेच दुसर्या का तिसर्या दिवशीच ते संतोष देशमुख यांचा प्रकरण घडलं.
मग आज तो एवढा मोठा कराड आहे त्याचं नाव नसतं का घेतलं मी पण नाही तो कश्यातच आमच्यात नव्हता, तो काहीही असेल पण हे निखिल फड, कैलास फड, धनंजय मुंडे त्याची बायको होती पहिली आहे का दुसरी आहे हे माहित नाही मला. बायको होती ठेंगणीशी गोरीशी आई होत्या त्याच्या घरी त्याचा एक चुलत भाऊ पण होता. मी पैसे मागायला गेल्यावर म्हटलं सर मला पैसे पाहिजे मला पैसे द्या, तर ते म्हणाले पुरावा घेवून ये. साहेब पुरावा कशाला पाहिजे वो म्हटलं आहो तुम्ही सुखी नाही राहणार तुमच्या जवळ पैसे दिल्यानंतर तुम्ही डब्यात पैसे. झिन्याने पैशाचे डबे वर गेले हा शब्द त्यांना बोलली मी.
त्यावर मला धनंजय मुंडे समोर कैलास फड याने धमकी दिली. आता परत पैसे मागायला आली तर रिव्हॉलवरनरे उडवून देऊ, कानफटीला रिव्हालवर लावली त्या पोट्यानं निखिल फड ने कंबरेची काढून घोडा आहे म्हणत. त्याच्या बापाने त्याला धरून ठेवलं होतं त्याला.
पोलिस त्यांच होतं, पोलिस स्टेशन त्यांचं होतं. पोलिसात गेल्यावर त्यांनी हाकलून लावलं मला परळी पोलिसांनी, पोलिस म्हणाले चला चला काय नाही म्हणे इथे असे कित्तेक येतात आणि कित्तेक जातात. काहीच कारवाई झाली नाही. त्याच्यानंतर आता कुमावत साहेबांना उपोषणाचा अर्ज..
शुक्रवार पासून उपोषण करायचं होतं बीडला तो पण अर्ज आहे माझ्याकडं. मग जरांगे साहेब म्हणाले काही करायची गरज नाही, आता मीच याला मार्गी लावतो. तिथपर्यंत मला पोहोचवणार्यांनी पोहोचवलं. चार बीडची मुलं होती बिचारे त्यांनी मला पत्ता दिला आणि मूला पोहचवलं तिथपर्यंत गावात.
धनंजय मुंडेच्या दुसर्या पत्नीकडं गेली मी काही नाही तीने कंटिनिव्ह फोन लावले त्याला तीच्या आणि माझ्या मोबाईलनं म्हणाली की ‘ओ आके बैठी है तिन दिनसे उसके पैसे दे दो’ तीने मला खुप प्रोत्साहन दिलं पण तो (धनंजय मुंडे) म्हणे हा ‘देऊंगा’ मग म्हणाला ‘है क्या तुम्हारी बाजू मे.. तर ती म्हणे ‘है ना.. तो म्हणे मै भी रिपोर्ट देऊंगा.. तर मी म्हटल साहेब त्या निखिल फडला आणि त्याला घेऊन या ना!, म्हटलं तर मला म्हणे ये परळीत. कशी जिवंत जाते बघता.. मग मी म्हटले येते ना.. शिवरात्रीच्या एकादशीच्या दिवशीची गोष्ट आहे. येते म्हटलं परळीत.
दोन दिवस मात्र करुणा मंडे यांनी जेवायला घातलं मला. जरांगे पाटील यांना भेटल्यावर मला नक्कीच न्याय मिळल अशी खात्री झाली आहे. मनोज जरांगे माझे पैसे काढून देतील माझी परत रिअपिल करेल मला शंभर टक्के गॅरंटी आहे. जरांगे पाटील हे माझ्या पतीला मृत्यू पश्चात न्याय मिळवून देतील. त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. भरपूर तक्रारी दिल्या मला इथल्या ऑफिसचे ओएस म्हणतायत की या बाईला सवय पडली आहे अर्ज द्यायची. नवरा होता तेव्हापासून आत्ता नवर्याच्या पश्चात अर्ज आहेत माझ्याकडे. शेवटी मला असं पत्र दिलं की कोर्टात जा न्यायालयीन लढाई लढा.
जरांगे पाटलांनी विचारलं मला की, तुम्ही ब्राम्हण आहात नागपूरच्या रहिवाशी आहात आणि साहेबही ब्राम्हण आहेत. मी त्यांच्या सासर्याचंही नाव सांगू शकते ना की शरद रानडे कोण आहेत. मग मी शोभाताई फडणवीसचं सांगते, तुमचे सासरे आहे ना , मी कधी नाही उल्लेख केला. ब्राम्हण समाजात आम्ही पैसे भरतो ब्राम्हण समाजाच्या मिटींगला सगळे ब्राम्हण असतात. पण शोभाताई फडणवीस माझ्या वडिलांच्या नात्यात आहेत.
माझ्या दोन बहिणी चंद्रपूरला आहेत त्यांच्या मुलच्या जवळ धाटे आणि सिंधू त्यांच्या नात्यात आहे म्हणनू शोभाताईंनी मला दोन तीन वेळा जेवायला नेलं धंतोलीला दोन वर्षापूर्वीच्या अधिवेशनात. अजूनही न्याय नाही मिळाला. जरांगे पाटील न्याय देतील हे शंभर टक्के गॅरंटी आहे 110 टक्के गॅरंटी आहे. एकच आहे माझे जरांगे साहेब मला माझे पैसे मिळवून देतील आणि माझी विभागीय चौकशीची अपिल रिओपन करून देतील. आणि सत्यता तेव्हाच लक्षात येईल की पोलिस खात्यात किती चालते.
माझा नवरा कुठलाच गुन्हेगार नाही आम्ही क्रिमीनल आमच्यावर गुन्हे नाहीत माझ्या नवर्यावर गुन्हे नाहीत कुठलाच गुन्हा नाही . विभागीय चौकशीत दुधवाला, किराणा, कापड हे चार्जेस लावलेले आहेत. त्याचवर काय रेप चे गुन्हे होते का चोर्या मार्या होत्या का काहीच नाही. कुठल्याच प्रकारचं इलिकेशन नाही तो माणुस इतका निर्मळ होता की तो स्वर्गात गेला पण यांनी जिव घेतला ऋषिकेश कदम, धनंजय मुंडे, निखिल फड, कैलास फड यांनी माझ्या नवर्याचा जिव घेऊन बळी घेतला आणि बळी दिला. आणि मला न्याय हा मिळणारच याची मला गॅरंटी आहे.



Comments