मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच; 200 युनिट मोफत वीज, महिला सुरक्षा आणि आमली पदार्थांच्या गैरवापराला आळा- मुख्यमंत्री विजय थालापती
- Navnath Yewale
- 2 days ago
- 3 min read

आज 10 मे 2026 रोजी, अभिनेते-राजकारणी थलपती विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर तामिळनाडूचे राजकीय चित्र बदलले. काळा कोट आणि पांढरा शर्ट परिधान करून, विजय यांनी शपथविधी सोहळ्याला एक आधुनिक स्पर्श दिला. त्यांनी 200 युनिट मोफत वीज, महिला सुरक्षा आणि आमली पदार्थाविरोधात विशेष दल स्थापन करण्याची घोषणाही केली.
वास्तविक, तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर टीव्हीके प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी जनतेला संबोधित केले. या संबोधनात त्यांनी या तीन घोषणा केल्या. मुख्यमंत्री म्हणून आपल्या पहिल्या संबोधनात टीव्हीके प्रमुख म्हणाले की, “ या भावनिक क्षणी सुरुवात कशी करावी किंवा काय बोलावे हे मला कळत नाही. मी राजघराण्यातून आलेलो नाही. मी तुमच्यातूनच आलो आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे, तुमच्या भावाप्रमाणे. तुम्ही मला प्रेमाने स्वीकारले आहे आणि चित्रपटसृष्टीत खूप मोठे स्थान दिले आहे. आजपासून मी अमली पदार्थांच्या व्यसनावर अंकुश ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना सुरू करणार आहे.
आपल्या तरुणांना त्यापासून वाचवणे हे आपले कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे मी कायदा आणि सुव्यवस्था सुनिश्चित करुन प्रत्येकाच्या सुरक्षेची हमी देईन. काही लोकांनी माझा अपमान केली तरी, मग ते मित्र असोत वा शत्रू, हे 80 दशलक्ष लोक माझेच आहेत. माझे मन मला सांगते की मी शिक्षण, रस्ते, पिण्याच्या पाण्यसाची सोय आणि इतर अत्यावश्यक सेवांवर पूर्ण लक्ष केंद्रित केले पाहिजे. मी आधी म्हटल्याप्रमाणे, मी लोकांच्या पैशाला हात लावणार नाही.
माझे सरकार पारदर्शक असले पाहिजे: मुख्यमंत्री विजय
मुख्यमंत्री विजय म्हणाले की, “ सर्व गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर, मी जनतेसाठी एक ‘ श्वेतपत्रिका’ प्रसिद्ध करणार आहे. माझे सरकार पारदर्शक असावे अशी माझी इच्छा आहे. ही पहिली गोष्ट आहे जी मला करायची आहे. तामिळनाडूच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, मला कोणाला भेटायचे असेल, तर मी ते गुप्तपणे किंवा बंद दाराआड करणार नाही. मी जे काही करेन, ते उघडपणे आणि पूर्ण पारदर्शकतेने करेन,” मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की मला थोडा वेळ द्यावा. मी दिलेली सर्व आश्वासने हळूहळू पूर्ण करीन आणि ती अंमलात आणण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न करीन. हे तुमचे सरकार आहे. मी महिलांसाठी कडक सुरक्षा सुनिश्चित करीन.
आम्ही कठीण परिस्थितीत सत्तेवर आलो आहोत: मुख्यमंत्री विजय म्हणाले की, “ लाखो लोक माझ्या पाठीशी उभे असल्याने माझ्या मनात हा विश्वास आहे की, कितीही अडचणी आल्या तरी आपण एकत्र मिळून कोणत्याही आव्हानाला सामोरे जाऊ शकतो. आज, आपले तामिळनाडू सरकार कोणत्या परिस्थितीत आहे, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. मागील सरकारने 10 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्त मागे ठेवले होते. सत्ता सोडण्यापूर्वी त्यांनी सरकारी तिजोरी पूर्णपणे रिकामी केली. आम्ही अशा कठीण परिस्थितीत सत्तेवर आलो आहेत, पण मी तामिळनाडूच्या जनतेला वचन देतो की, मी जनतेच्या पैशाचा एक रुपयाही गैरवापर करणार नाही. मी संपत्ती जमा करण्यासाठी राजकारणात आलेलो नाही आणि हे तिम्हिा सर्वांना चांगलेच माहीत आहे.” मी भ्रष्टाचार किंवा कोणालाही गैरमार्गाने पैसे कमवू देणार नाही. हे सरकार जनतेचे असेल आणि आपण सर्व मिळून एक अधिक मजबूत आणि उत्तम तामिळनाडू घडवू
प्रत्येक आव्हानाचा एकत्र सामाना करू: तामिळनाडचे मुख्यमंत्री आणि टीव्हीके प्रमुख सी. जोसेफ म्हणाले की, “ आम्ही तुमच्यासोबत आहोत, ‘ असे सांगून तुम्ही सर्वांना मला राजकारणात येण्यास सांगितले आणि आज तुम्ही मला तामिळनाडूचा मुख्यमंत्री बनवले आहे. मला जे काही दु:ख आणि अडथळे आले, ते तुम्ही स्वत:चे मानून या संपूर्ण माझ्या पाठीशी उभे राहिलात. मी काही देवाचा दूत नाही. मी फक्त एक सामान्य माणूस आहे. “ पण जेव्हा लोक माझ्यासोबत उभे राहतात, तेव्हा माझा विश्वास आहे की आपण काहीही साध्य करू शकतो आणि प्रत्येक आव्हानाचा, ते कोणतेही असो एकत्र सामना करू शकतो.
तामिळनाडूवर 10 लाख कोटींचे कर्ज : तामिळनाडूवर जवळपास 10 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. प्रशासनाची सूत्रे हाती घेतल्यानंतरच परिस्थिती आणि आपल्यासमोरील आव्हाने खर्या अर्थाने समजू शकतात. पण मला प्रमाणिकपण आणि दृढनिश्चयाने तामिळनाडूला पुढे न्यायचे आहे. मी या राज्यातील प्रत्येक महिलेला अश्वासन देतो की, त्यांची सुरक्षा हे आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल आणि महिलांना लक्ष्य करणार्या गुन्ह्यांवर त्वरित खटला चालवला जाईल. अमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेल्यांना एकटे सोडले जाणार नाही. आम्ही त्यांची सुटका आणि पुनर्वसन करण्यासाठी काम करू आणि एक निरोगी समाज घडवू.



Comments