मुुंबईसह राज्यातील 29 महापालीका महापौरपदाचे आरक्षण जाहीर मुंबई, पुणे सर्वसाधारण महिला तर ठाणे अनुसूचित जाती, कल्याण-डोंबिवली अनुसूचित जमातीखुल्या प्रवर्गासाठी
- Navnath Yewale
- Jan 23
- 2 min read

मुंबई: मुंबईसह राज्यभरातील 29 महापालिकांच्या महापौरपदासाठीची सोडत आज जाहीर झाली आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. महापालिका सोडतीसाठी भाजपकडून महामंत्री राजेश शिरवडकर, ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार मनोज जामसुतकर, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजितपवार गटाकडून आनंद परांजपे उपस्थित होते. दरम्यान 50 टक्के महिला आरक्षणाचे नियम लागू केल्याने राज्यातील 15 महापालिकांवर महिला राज असणार आहे. तर 14 ठिकाणी सर्वसाधारण वर्गाला संधी मिळाणार आहे.
50 टक्के महिला आरक्षणांनुसार 4 महापालिकांमध्ये ओबीसी महिला, तर 9 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे. राज्यातील 29 महानगरपालिकासाठी 15 जानेवारीला मतदान झालं होतं.तर 16 जानेवारीला मतमोजणी झाली होती. कोणत्या महापालिकेत कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या आरक्षण सोडतीनुसार अनुसूचित जमाती 1, अनुसूचित जाती 3, नरगारिकांच्या मागास प्रवर्ग (ओबीसी) 8, सर्वसाधारण 17 प्रवर्गासाठी राखीव सुटल्या आहेत
महानगरपालीकेचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी राखील सुटले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षण सोडतीवरून आता राजकीय आखाड्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत.
मुंबई महापौरपदाच्या आरक्षण सोडतीवरून सतेज पाटील यांंनी टोला लगावला आहे. सतेज पाटील म्हणाले की. देशाची आर्थिक़ राजधानी असलेल्या मुंबईचं महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाले आहे. मात्र, मुंबईच्या महापौर पदाचा निर्णय दिल्लीतून होणार आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना किती दबावाखाली आहे हे दोन-तीन दिवसांत झालेल्या घटनांवरुन दिसून येते. शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर अजून शिल्लक आहे का? हे दोन दिवसात कळेलच असा टोला काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी लगावला. मुंबईत आरक्षण सोडत झाल्यानंतर आमदार पाटील कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते. कोल्हापूर महापालिकेचं महापौरपद शिवसेनेला मिळणार नाही, मिळालं तर त्यांचं अभिनंदन करायला हवं असा चिमटाही त्यांनी काढला.
आमित साटम म्हणाले: मुंबई महापालिकेत महापौरपद महिलांसाठभ राखीव झालं आहे. मुंबईसह इतर अनेक महापालिकांवर महिला राज असणार आहे. यावर भाजप नेते अमित साटम यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, येणार्या काळात मुंबई शहराचं नेतृत्व एक माता भगिनी करणार आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि येणार्या काळात मातृशक्तीच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालीका ही भ्रष्टाचार मुक्त होणार मुंबई शहर खड्डे मुक्त होणार, मुंबईची तुंबई होणार नाही, मुंबईचा विकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, नरेंद्र मोदींच्या व्हिजनुसार काम करण्याकरिता आपली मातृशक्ती सज्ज होणार, असा विश्वास साटम यांनी व्यक्त केला आहे.
किशोरी पडेडणेकरांचा आरोप : महापालिका निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला. अनेक महापालिकांवर भाजपाची एक हाती सत्ता आली आहे. मुंबईसह पुण्यात खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव झाले आहे. मात्र आरक्षण सोडत जाहीर होताच राजकीय समीकरणे थेट बदलल्याने बघायला मिळत आहे. अनेक इच्छुकांच्या अशांवर पाणी फिरताना दिसत आहे. मुंबई महापालिकेचं महापौरपद एसटी वर्गासाठी राखीव होईल अशी चर्चा होती. पण आज ऐनवेळी मुंबई महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या आरक्षणावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. ठरवून सोडत काढण्यात आली आहे. असा आरोप करतानाच एसटी प्रवर्गातून चिठ्ठ्या का टाकल्या नाही? असा सवाल पेडणेकरांनी उपस्थित केला आहे. जाणूबुजून ठरवून केलेली ही लॉटरी आहे, असं म्हणत पेडणेकरांनी या सोडतीच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.
राज्यातील 29 महापालिका आरक्षण सोडत : बृहनमुंबई -सर्वसाधारण महिला, ठाणे- अनुसूचित जाती खुला, कल्याण- डोंबिवली -अनुसूचित जमातीखुला, नवी मुंबई सर्वसाधारण महिला, वसई-विरार सर्वसाधारण खुला, मिरा-भाईंदर -सर्वसाधारण महिला, उल्सासनगर-ओबीसी खुला, भिवंडी-निजामपूर, सर्वसाधारण खुला, पनवेल -ओबीसी खुला, पुणे-सर्वसाधारण महिला, सांगली-मिरज-कुपवाड -सर्वसाधारण खुला, कोल्हापूर-ओबीसी खुला, पिंपरी चिंचवड- सर्वसाधारण खुला, सोलापूर-सर्वसाधारण खुला, नगापूर-सर्वसाधारण महिला, आकोला -ओबीसी महिला, अमरावती -सर्वसाधारण खुला, चंद्रपुर-ओबीसी महिला, नाशिक सर्वसाधारण महिला, मालेगाव -सर्वसाधारण महिला, धुळे- सर्वसाधारण महिला, जळगाव - ओबीसी महिला, आहिल्यानगर-ओबीसी महिला, छत्रपती संभाजीनगर- सर्वसाधारण खुला, लातूर अनुसूचित जाती महिला, नांदेड-वाघाळा- सर्वसाधारण महिला, परभणी-सर्वसाधारण खुला, इचलकरंजी- ओबीसी खुला, जालना-अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव सुटले आहे.



Comments