मेडे, मेडे, मेडे अजित पवारांच्या विमानासोबत शेवटच्या क्षणी काय घडलं?
- Navnath Yewale
- 7 days ago
- 2 min read

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चार्टर्ड विमानाचा बारामतीजळ भिषण अपघात होऊन पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबईहून निघालेल्या या विमानात अचानक तांत्रिक अडचण निर्माण झाली. शेवटच्या क्षणी वैमानिकाने दिलेला ‘मेडे’ सिग्नल आणि लँडिंगचा अयशस्वी प्रयत्न, या दुर्घटनेमागील घडामोडींची सविस्तर माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी सकाळी मुंबई विमानतळावरुन बारामतीसाठी चार्टर्ड विमानाने उड्डाण घेतले होते. सुरुवातीला प्रवास पूर्णपणे सुरळीत सुरू होता. मात्र बारामती विमानतळाच्या एअरस्पेसमध्ये विमान प्रवेश करताच त्यातील काही यंत्रणा अचानक बंद पडल्या. या बिघाडामुळे परिस्थिती गंभीर बनली आणि वैमानिकांना तात्काळ निर्णय घ्यावे लागले.
मुख्य वैमानिक कॅप्टन सुमित कपूर यांनी प्रसंगावधान राखत विमानावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. रडारवर विमान व्यवस्थित असल्याचे दिसत होते. त्यामुळे पहिल्या टप्प्यात त्यांनी धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र तांत्रिक अडचणी वाढल्याने त्यांनी विमान पुन्हा वळवले आणि दुसर्यांदा उतरण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नादरम्यान विमानाचे नियंत्रण पूर्णपणे सुटले आणि ते जवळच असलेल्या एका शेतात कोसळले. अपघात इतका भीषण होता की, विमानाला तात्काळ आग लागली आणि त्यात अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
विमान जमिनीवर आदळण्याच्या काही क्षण आधी कॅप्टन सुमित कपूर यांनी एअर ट्रॅफिक कंट्रोल ला “ मेडे ,मेडे, मेडे” असा संदेश दिला होता. हा शब्द फ्रेंच भाषेतमील असून त्याचा अर्थ मदतीसाइी केलेली शेवटीची हाक असा होतो. इंजिन निकामी होणे, विमानात आग लागणे किंवा क्रॅश होण्याची शक्यता असताना वैमानिक हा संदेश रेडिओवर ती वेळा देतो.
मेडे कॉल मिळताच एटीसी ने इतर सर्व विमानांशी संपर्क थांबवून संकटात सापडलेल्या या विमानाला सर्वोच्च प्राधान्य दिले. धावपट्टीवर अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या. त्या वेळी बारामती विमानतळाची धावपट्टी मोकळी असल्याने विमान उपरवण्याची परवानगीही देण्यात आली होती. मात्र विमानातील तांत्रिक बिघाड इतका गंभीर होता की सुरक्षित लँडिग शक्य झाले नाही. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी विमान अपघात तपासणी ब्युरो ने तातडीने आदेश दिले असून ‘ ब्लॅक बॉक्स’ सापडल्यानंतर नेमकी कारणे स्पष्ट होतील.



Comments