युद्धाचा भडका: गॅस तुटवड्याचा संभाजीगनर मधील उद्योगांना फटका 5 मोठे उद्योग बंद; लघु उद्योगांनाही घरघर!
- Navnath Yewale
- 14 hours ago
- 2 min read

छत्रपती संभाजीनगर: अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमधील युद्धजन्य परिस्थितीचे परिणाम जगभरातील देशांवर होत आहेत. भारतातील इंधन पुरपठ्यावरही याचा परिणाम झाल्याचे पाहायल मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्र सरकारचा संदर्भ देत इंधन पुरवठा कमी होणार नाही, मूुबलक गॅस पुरवठाही असल्याचे म्हटले आहे. मात्र, पुरेशा इंधनाअभावी छत्रपती संभाजीनगरमधील पाच मोठे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. गॅसचा तुटवडा कायम राहितल्यास उद्या मोठ्या प्रमाणात उद्योग बंद होतील. ऑटो इंडस्ट्री, फार्मा कंपनीला मोठा फटका बसू शकतो असे म्हणत सीएमआयए म्हणजेच चेंबर ऑफ मराठवाडा अँड अॅग्रीकल्चर संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले आहे.
छत्रपती संभाजीनगर ऑटो इंडस्ट्रीला गॅस टंचाईचा मोठा फटका बसतो आहे. गॅस संपल्यामुळे पाच मोठे उद्योग बंद करण्याची वेळ अद्योजकांवर आली आहे. उद्या याचा फटका मोठ्या प्रमाणात बसेल आणखी उद्योग बंद होतील. ऑटो इंडस्ट्री, फार्मा कंपनी, स्टील कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. संभाजीनगर नगर उद्योगाला रोज 250 ते 300 मेट्रीक टन गॅसची गरज आहे. गॅस पुरवठा पू3र्ण बंद आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सीएमआयए (चेंबर ऑफ मराठवाडा अँड अॅग्रीकल्चर) संघटनेने पत्र लिहून मदतीची मागणी केली, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष उत्सव मंचर यांनी दिली.
सभाजीनगरमधील शेंद्रा, वाळूज, चिखलठाणा येथील अॅटोमोबाईल इंडस्ट्रीत गॅस वापरला जातो, स्टील कंपनीला देखील मोठा गॅस लागतो. मात्र गेल्या काही दिवसांत गॅसचा पुरवठा घटल्याने काही युनिट बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, एकदा हे युनिट बंद पडल्यास पुन्हा सुरू करणे खूप अडचणीचे असते. त्यामुळे सरकारकडे विनंती आहे की, आम्हाला मदत करावी, असे मोठे उद्योजक फटका बसल्यास, छोटे उद्योजक पूर्ण बंदइ पडतील, कृषी आणि इतर युनिट आहे ते बंद पडू शकतात.. कंपनी बदं पडल्यास त्याला सुरू करण्यास 24 ते 48 तास लागतात, पण यसात प्रोसेस सायकल बंद पडते.
स्टॉक आहे पण ते खूप नाही, खूप गंभीर स्थिती आहे, आजची परिस्थिती गंभीर आहे, उद्या तर आणखी गंभीर परिणाम जाणवतील, बजाज ऑटोला पुरवठा करणार्या युनिटला फटका बसणार आहे. आम्हाला विश्वास आहे सरकार मदत करेल, आम्ही मख्यमंत्री यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहोत, शिवाय मंत्री अतुल सावे यांच्याकडूनही बोलण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं संघटनेकडून कळविण्यात आले आहे.
गॅस तुटवड्यामुळे संभाजनगरमधील जवळपास 40 ते 50 लघुउद्योग बंद करण्यात आले असून पावडर कोटिंग, फोर्जिंग, केमिकल यासह इतर लघुउद्योग बंद झाले आहेत. संभाजीनगरमध्ये 4 हजार 500 हून अधिक लघू उद्योग असल्याची माहिती मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चरचे (मासिया) अध्यक्ष अर्जुन गायकवाड यांनी दिली.
या कंपन्यामध्ये होतो गॅसचा वापर
स्टील आणि इंजिनिअरिंग उद्योग, ऑटो कॉम्पोनंट्स उत्पादन, फार्मास्युटिकल कंपन्या, ब्रुअरीज आणि फूड प्रोसेसिंग, सिरॅमिक्स आणि ग्लास उद्योग, उत्पादन प्रक्रियेत वापरले जाणारे बॉयलर आणि थर्मिक फ्लुइड हीटर्स



Comments