येवल्यात छगन भुजबळांना शह देण्यासाठी दोन दिग्गज एकत्र नवा प्रयोग शरद पवार, एकनाथ शिंदेचा पक्षाची युती
- Navnath Yewale
- Nov 17
- 1 min read

येवला : राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांना शह देण्यासाठी येवला नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवेसेना शिंदे गटाने युती केली आहे.खास भुजबळांना धोबीपिछाड देण्यासाठी शिवसेना (शिंदे गटा) चे किशोर दराडे व शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माणिकराव शिंदे एकत्र आले आहेत.
येवले नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. मायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना व महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष शहर विकासाठी एकत्र आले आहेत. येवल्याच्या राजकारणात फार दिवसांपासून या शहर विकास आघाडीच्या प्रयोगाची चर्चा होती. तो प्रयोग आता प्रत्यक्षात झाला आहे.
शिवसेनेच आमदार किशोर दराडे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे यांनी पुढाकार घेत या युतीची घोषणा केली आहे. शहर विकासाठी एकत्र येत आहोत असे दोन्ही बाजूंनी सांगण्यात आले. दरम्यान यामुळे मंत्री छगन भुजबळ यांना येवला नगरपरिषद निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे.
माणिकराव शिंदे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभेला छगन भुजबळ यांच्या विरोधात निवडणुक लढवली. शिंदे यांच्यासाठी शरद पवार यांनी येवल्यात सभा घेतली होती. मात्र, छगन भुजबळांनी शिंदे यांचा निवडणुकीत पराभव केला होता. तर भुजबळांचे दराडे बंधुंसोबतही संबंध बिघडलेले आहेत. त्यापार्श्वभुमीवर दराडे बंधु व माणिकराव शिंदे भुजबळांना येवला नगरपरिषदेच्या निवडणुकीत शह देण्यासाठी एकत्र आले आहेत. रुपेश दराडे यांना नगराध्यक्षपदासाठी शिवसेना (शिंदे) गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
छगन भुजबळ आजारी असल्याने पुतणे समी भुजबळ हे येवल्याच्या मैदानात उतरले आहेत. शिवसेना (शिंदे) पक्षाच्या विरोधात समीर भुजबळांचे भाजप सोबत युती करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशात दराडे बंधु व शिंदेची झालेली युती समीर भुजबळांना धक्का देणारी आहे.
या युतीमुळे येवला नगरपरिषदेतील लढत भाजप- राष्ट्रवादी (अजित पवार गट) यंती विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) -राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यात होऊ शकते. त्यामुळे आता भुजबळांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यातील निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.



Comments