राजधानी दिल्लीत आग्नितांडव: चार मजली इमारतील भीषण आग 4 जणांचा होरपाळून मृत्यू अनेक जखमी
- Navnath Yewale
- 12 hours ago
- 1 min read

नवीदिल्ली: राजधानी दिल्लीमध्ये 4 मजली इमारतीला भीषण आग लागल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या आगीत 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री 6:30 च्या दरम्यान आगीचा भडका उडाला. इमरातीलच्या ग्राऊंड फ्लोअरला असणार्या शू शॉपला आग लागली. ही आग क्षणात पूर्ण इमारतीमध्ये पसरली अन् जळून खाक झाली. आगीची माहिती मिळताच अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. काही तासात त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. पण तोपर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला होता.
राजधानी दिल्लीच्या अग्निशामन दलाला रात्री 6: 27 वाजता इमारतीला आग लागल्याची माहिती मिळाली. मंगल मार्केटजवळ एका घराला आग लागल्याची माहिती अग्निशामन दलाला मिळातच चार गाड्या घटनस्थळाकडे रवाना झाल्या. आग्निशामन दलाने अवघ्या काही तासात आग आटोक्यात आणली. इमारतीमधून 4 जणांचे मृतदेह बाहेर काढले. एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले.
दरम्यान, इमारतीच्या ग्राऊंड फ्लोअरमधील शू शॉपला आग लागण्याचे नेमकं कारण अद्याप समजू शकले नाही. आग्निशामन दलाकडून आगीचं कारण शोधण्यात येत आहे. पोलिसांकडून दुर्घटनेची नोंद करण्यात आली. मृतांपैकी एकाची ओळख पटली असून तो मालक सतींदर उर्फ जिमी (38) आहे. सविस्तर तपास करण्यासाठी गुन्हे आणि फॉरेन्सिक पथकांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.
याआधी राजधानी दिल्लीमध्ये 26 नोव्हेंबर रोजी नारायण औद्योगिक क्षेत्रातील एका चार मजली गोदामात भीषण आग लागली होती. पेंट्स अँड इलेक्ट्रिकल्स या गोदामात पहाटे 2: 15 वाजता आग लागल्याची घटना घडली होती. स्थानिकांनी तात्काळ दिल्ली अग्निशमन दलास आगीची माहिती दिली. अग्निशामन दलाने तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले.



Comments