राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडून पीडित कुटुंबीयांचे सांत्वन
- Navnath Yewale
- Nov 25
- 1 min read
डॉ. गौरीला न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुराव्याचे अश्वासन; जबाबदार तपासी यंत्रणांना सूचना

बीड: डॉ.गौरी गर्जे/पालवे यांच्या संशयास्पद मृत्यूने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणी स्वत: हस्तक्षेप करून कुटुंबाला मानसिक धीर देण्यासाठी कठोर कारवाईची ग्वाही दिली.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काल (दि.25 ) डॉ. गौरी यांच्या माहेरी बीड जिल्ह्यातील पिंपळनेर (ता.शिरुर कासार) येथे भेट देऊन त्यांचे वडिल डॉ. अशोक पालवे यांच्यासह आई-वडिल,नातेवाईकांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबाच्या भावना जाणून घेत अश्वान दिले. रुपाली चाकणकर म्हणल्या की, “ गौरी याच्या मृत्यूची सखोल, निष्पक्ष व जलदगतीने चौकशी करून दोषींना निश्चितच कठोर शिक्षा दिली जाईल. तपास प्रक्रियेत तसेच न्यायालयीन लढाईत महिला आयोग संपूर्ण सहकार्य करेल”
दरम्यान, यावेळी रुपाली चाकरणर यांनी जबाबदार पोलिस अधिकार्यांशी चर्चा करून तपासातील प्रगतीचा आढावा घेतला. कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आयोग तातडीने आवश्यक त्या सूचना देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पिंपळनेर परिसरातील नागरिकांनी गौरीच्या निधनाबद्दल व्यक्त होत असलेल्या संतापाच्या भावना आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांच्यासमोर व्यक्त केल्या. समाजात वाढत्या अत्याचारांच्या घटनांवर नियंतण ठेवण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
पिंपळनेरचे सरपंच मिठू जायभाये, आजीनाथ गवळी, इंजि. सतोष गोल्हार, राजकुमार पालवे, बबनराव दहिफळे, प्रणव मंगरुळकर, प्रज्ञा खोसरे, पोलिस निरिक्षक प्रवीण जाधव यांच्यासह नागरिक व जबाबदार अधिकारी उपस्थित होते.
डॉ. गौरीच्या मृत्यूने राज्यभरात निर्माण झालेल्या शोक आणि संतापाच्या पार्श्वभूमीवर महिला आयोगाची तत्परता महत्वाची ठरणार आहे. न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहणार असल्याची भावना कुटुंबीयांसह स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.



Comments