top of page

राज्याच्या राजकारणात ‘बिहार भवन’चा भडका! मुंबईच्या महापौर निवडी आधीच सत्ताधारी विरोधकात जुंपली; वाद पेटणार?


मुंबई: बिहार सरकारने मुंबईत बिहार भवन उभारण्यासाठी निधीची तरतूद करत प्रकल्प उभारणीला मंजूरी दिली आहे. महापौर निवडीपूर्वीच सत्ताधारी महायुतीने मुंबईत मराठी माणसांच्या अस्मितेला नख लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. मनसेचे नवनिर्वाचित नगरसेवक किल्लेदार यांनी मनसे आहे तो पर्यंत मुंबईत बिहार भवन होणार नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.


महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहूमत मिळाले. बहूमताचा आकडा पार करुनही महापौरपदावरून भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री पाच दिवसाच्या दावोस दौर्‍यावर आहेत. महापालिका निवडणुक मराठी-अमाराठीच्या मुद्याभोवती लढवण्यात आली. ठाकरे बंधूंनी सत्ताधारी महायुतीला मराठी- अमराठी मुद्यावरून घेरले चोहोबाजूने घेरले होते. राज ठाकरे यांनी मुंबई परप्रांतियांच्या घश्यात घालण्यासाठी यांना मुंबई हवी आहे, मुंबईतील भूखंड परप्रांतिय उद्योगपतीच्या घश्यात घालण्याचे षडयंत्र असल्याचे जाहीर आरोप प्रचारसभांतून केले होते. दरम्यान ठाकरे बंधूंच्या आरोपानुसार बोलास आणि फूलास एक किंवा योगायोग म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.


महापालिका निवडणुकीचा निकाल लागताच अवघ्या काही दिवसाने आज बिहारच्या एनडीए सरकारने मुंबईत भव्य ‘बिहार भवन’ प्रकल्प उभारणीला मंजूरी दिली आहे. मुंबईत मुंबई पोर्ट स्ट्रस्टच्या जागेवर ‘एलिफिन्स्टन इस्टेट’ भागात 30 मजली भव्य प्रकल्पासाठी 314 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये 178 खोल्या आणि 240 खाटांचे डॉर्मिटरीसह इतर आधुनिक सुविधा असतील. त्यावमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.


भाजप: भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक नवनाथ बन यांनी मुंबईत ‘बिहार भवन’ उभारण्यात येत असेल तर काय बिघडतयं, देशातील इतर राज्यात महाराष्ट्र भवन आहेत आयोध्यामध्ये महाराष्ट्र भवन आहे. मग त्या राज्यातील लोकांनी म्हणायचं का इथे महाराष्ट्र भवन नको म्हणून? असे प्रतिप्रश्न उपस्थित करत विरोधी पक्षांच्या आरोपांचं खंडण करण्याचा प्रयत्न केला.


मनसे: मनसेचे नवनिर्वाचित नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी जोपर्यंत मनसे आहे तो पर्यंत मुंबईत बिहार भवन होवू देणार नसल्याचे ठकणकावून सांगत सत्ताधारी महायुतीला खुलं आव्हान दिलं आहे.


शिवसेना: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी या केवळ बातम्या आहेत ‘ज्या-त्या वेळेस, आम्ही पाहू’ असं म्हणत गर्भीत इशारा दिला आहे. तर हा निर्णय मराठी माणसाच्या हिताविरोधात आहे. हा निर्णय मुंबईच्या जडणघडणीला धक्का देणार असून ‘मुंबई गहाण टाकण्याच प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.


——

Comments


bottom of page