top of page

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?, दोन्ही शिवसेनेच्या नेत्यात फूटीचा कलगितूरा ; शिवसेना (शिंदे) चे 20 आमदार भाजपच्या वाटेवर, तर शिवसेना (उबाठाचे) 13 आमदार ठाकरेंची साथ सोडणार!

ree

गेल्या काही वर्षापासून राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप पहायला मिळाले होते. सर्वात आधी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत 40 पेक्षा जास्त आमदार फोडत भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर काही दिवसांनी राष्ट्रवादीतही फूट पडली होती. अजित पवार यांनीही बर्‍याच आमदारांसह बाहेर पडत महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घूतला होता. या दोन घटनांमुळे राज्याच्या राजकारणाची चर्चा संपूर्ण देशभरात झाली होती. अशातच आता राज्यात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे निम्म्यापेक्षा जास्त आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेच्या (शिंदे ) एका मंत्र्याने केला आहे. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.

राज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये सुरुवात झाली आहे. या अधिवेशनासाठी राज्यातील सर्व मंत्री आणि आमदार नागपूरमध्ये पोहोचले आहेत. अशातच आता शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 13 आमदार माझ्या संपर्कात असल्याची माहिती शिरसाट यांनी दिली आहे. या सगळ्या आमदारांची नावे माझ्याकडे आहेत. वेळ आल्यावर सांगेन असं शिरसाट यांनी म्हटलं आहे. शिवसेना (ठाकरे) कार्यपद्धतीला वैतागून शिवसेना (शिंदे) मध्ये येण्याचा आमदारांचा मानस असल्याचंही मंत्री शिरसाट म्हणाले.


दरम्यान 2024 च्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या 20 उमेदवारांनी विजय मिळवला होता. यातील 13 आमदार आता शिवेसनेच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आह .भविष्यात असं झाल्यास उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता आगामी काळात नेमकं काय होणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.


Comments


bottom of page