राज्यात राजकारणाचा खेळ मांडला: अमरावतीत अभद्रयुती, सत्तेसाठी भाजपची चक्क एमआयएमशी गट्टी
- Navnath Yewale
- Jan 23
- 2 min read

अमरावती : महानगरपालिका निवडणुकीतून राज्यात अभद्र युती होताना दिसत आहे. अमरावतीमध्ये चक्क भाजपा आणि एमआयएमने युती केली असून दोन वेगवेगळ्याव विचारांचे पक्ष एकत्र आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगरपरिषदेत सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि एमआयमएमने एकत्र येत सभापती निवडून सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून हिंदुत्ववादी म्हणणार्या भाजपवर विरोधी पक्षांकडून जोरदार टीकेची झोड उठवली जात आहे.
अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदेत भाजप आणि एमआयएमची युती झाली असून अचलपूर नगरपरिषदेच्या समिती सभापती पदासाठी भाजप आणि एमआयएमने एकमेकांना साथ दिली आहे. त्यामुळे एमआयएमच्या नगरसेवकाला शिक्षण व क्रिडा समितीचे सभापती पद मिळाले आहे. एमआयएमच्या 3, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 2 तर तीन अपक्ष नगरसेवकांचा गट हा भाजपासोबत गेल्याने अचलपूर मध्ये भाजप आणि एमआयएम सोबत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.
दरम्यान सत्ता स्थापनेत भाजपने एमआयएमसोबत केलेल्या युती बाबत अचलपूरचे भाजप आमदार प्रीवण तायडे यांना विश्वासात घेतलं नसल्याचं ते म्हणाले. “ महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मला प्रभाग क्रमांक एक ची जबाबदारी दिली होती त्यामुळे मी महापालिकेच्या निवडणुकीत व्यस्त होतो. मी हिंदुत्ववादी विचारसरणीचा आमदार आहे आमचा पक्षही हिंदुत्ववादी विचारसरणीचा आहे त्यामुळे मी असं कधीही करू शकत नाही. मात्र अचलपुरात आमचे चार गट आहेत. मात्र आता या संपूर्ण प्रकारावर वरिष्ठ काय निर्णय घेतात आम्हाला मान्य असेल ” असंही अचलपूरचे भाजप आमदार प्रवीण तायडे म्हणाले.
या संपूर्ण सावळ्या गोंधळावर वडेट्टीवारांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला आहे. भाजप आणि एमआयएमची सेटिंग आहे. हे दोघेही जेवताना वेगवेगळे सोबत जेवतात. एक व्हेज खातो तर एक नॉन व्हेज खातो. एमआयएमचा फायनान्सर कोण आहे? काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी हे सुरू आहे. काही काळासाठी हे चालेल पण सत्यता बाहरे यईल. तसेच हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे शाही स्नानापासून शंकराचार्य यांना मारहान झाली यावरून ही विचारांची विकृती आहे. हिंदुत्व सत्ता मिळवण्यासाठी आहे त्यापेक्षा दुसरा काही संबंध हिंदुत्वाशी नाही. आहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला मणिकर्णिका घाट जमीनदोस्त केला. हे पाहता भाजपने हिंदत्वाशी देणं घेणं नाही. हे फक्त सत्तेसाठी हिंदुत्व आहे असे म्हणत वडेट्टीवार यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीही भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. भाजप निर्लज्ज सदासुखी सत्तेसाठी वाट्टेल ते करू शकतो अशी टीका त्यांनी केली आहे. दरम्यान हिंदुत्वासाठी भाजपने अचलपूरमध्ये एमआयएम सोबत एकत्र येत सभापती निवड केल्याने भाजपचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात की स्थानिक भाजपने घेतलेल्या निर्णयाला भाजपचे वरिष्ठ नेते साथ देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.



Comments