राज्यातील 10 नगरपरिषदांच्या निवडणुका स्थगित प्रचारच्या शेवटच्या टप्प्यात निवडणूक अयोगाचा निर्णय
- Navnath Yewale
- 11 hours ago
- 1 min read

मुंबई: राज्यातील दहा नगरपरिषदांच्या निवडणुका ऐनवेळी स्थगित करण्यात आल्या आहेत. प्रचाराची मुदत संपायला अवघे काही तास बाकी असताना राज्य निवडणुक आयोगाने हा महत्वाचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
निवडणुक प्रक्रियेबाबत दाखल झालेल्या याचिकेवर जिल्हा न्ययालयाचा निकाल येण्यासाठी वेळ लागणार असल्याचे स्पष्ट झाल्याने आयोगाने निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे बारामती, फलटण, महाबळेश्वर, अंबरनाथ, कोपरगावसह दहा नगरपरिषदांमध्ये मतदार आणि उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणूका स्थगित करण्याचा निर्णय तात्पुरता असून, न्यायालयाचा निकाल आल्यानंतर नव्याने मतदानाचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. दरम्यान, मतदानाच्या अवघ्या काही तासांपूर्वीच झालेल्या या घडामोडीनंतर राजमीय पक्षांकडून प्रतिक्रिया उमटत होत आहेत.



Comments