top of page

राष्ट्रपतींच्या निवास्थानावर हल्ला, मंत्र्यांच घर जाळलंपीएम पलायनाच्या तयारीत; नेपाळमध्ये Gen-z चा हैदोस

ree

सोशल मीडिया अ‍ॅप बंदीवरून नेपाळमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. नेपाळमध्ये सरकारने बंदी मागे घेतल्यानंतरही हिंसक आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्यांना तरुणांनी राष्ट्रपतींच्या घरावर हल्ला करत जाळपोळ केली आहे. तर कायदा मंत्र्याचे घर जाळले आहे. काही वृत्तांनुसार नेपाळचे पंतप्रधान केपी ओली हे राजीनामा देण्याच्या तयारीत असून देशाबाहेर पलायन करण्याची शक्यता आहे.


नेपाळमध्ये राजकीय संकट अधिकच गडद होत चालले आहे. आज केपी ओली सरकारमधील 9 मंत्र्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. या मंत्र्यांनी सोमवारी सोशल मीडिया बंदीवरून झालेल्या हिंसक जनरल-झेड निदर्शनादरम्यान सरकारी धोरणे आणि सरकारी कृती हे राजीनाम्याचे कारण असल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे, नेपाळमधील बिरगंज येथे नेपाळ सरकारचे कायदा मंत्री अजय कुमार चौरसिया यांचे घरही जाळण्यात आले आहे.


राजीनामा दिलेल्या मंत्र्यांमध्ये कृषी, शिक्षण, आरोग्य आणि माहिती मंत्रालायाशी संबंधित मंत्री आहेत. सरकारने नागरिकांचा आवाज दाबण्यासाठी आणि लोकशाही अधिकारांचा आदर न करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. तसेच, उपपंतप्रधानांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा हा केवळ काँग्रेसमध्येच नव्हे तर सरकारच्या उच्चस्तरीय पातळीवरही राजकीय असंतोष पसरल्याचे संकेत आहेत.

नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी तातडीने सर्व पक्षांची बैठक बोलावली आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि अर्थपूर्ण तोडगा काढण्यासाठी मी संबंधित पक्षांशी संवाद साधत असल्याचे त्यांनी सांगितले पंतप्रधानांनी आंदोलनकर्त्यांना शांततेचे आवाहन केले आहे.

नेपाळची राजधानी काठमांडू तरुणांच्या सरकारविरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे निदर्शकांनी अनेक ठिकाणी जाळपोळ केली, त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी लष्कराने अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या.

Comments


bottom of page