top of page

राष्ट्रवादीचा यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा लाडकी बहीण योजनेतील वंचित महिलांच्या हक्कासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस चा संबंधित मंत्र्यांच्या निवास्थानी मोर्चाचा इशारा

Jun 2
1 min read



यवतमाळ: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी, तांत्रिक त्रुटी, नवीन पात्र युवतींना अर्जाची संधी तसेच विविध कारणांमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी युवती काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. पक्षाच्या कार्याध्यक्ष मनिषा काटे (भोसले) यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर जिल्हाधिकारी, यवतमाळ यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मनिषा काटे (भोसले) यांनी शासनाला इशारा देत, “१५ दिवसांत प्रश्न मार्गी लावावेत, अन्यथा पुढील मोर्चा संबंधित मंत्र्यांच्या निवासस्थानी काढण्यात येईल,’ असा इशारा दिला.


निवेदनात ई-केवायसीसाठी मुदतवाढ देणे, नवीन पात्र युवतींसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करणे, तांत्रिक त्रुटींमुळे प्रलंबित असलेले अर्ज दुरुस्त करण्याची संधी देणे तसेच आयटीआर रिलेटिव्ह या कारणामुळे अपात्र ठरलेल्या महिलांच्या प्रकरणांची पारदर्शकपणे फेरतपासणी करून पात्र महिलांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली. योजनेचा लाभ मिळत असताना अचानक हप्ते बंद झालेल्या महिलांना पुन्हा लाभ सुरू करावा आणि कोणतीही पात्र महिला योजनेपासून वंचित राहू नये यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.


यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) कार्याध्यक्ष मनिषा काटे (भोसले), शेतकरी चळवळीचे प्रा. पंढरी पाठे, दिलीप इंगोले, जिल्हाध्यक्ष युवक संकेत टोणे, जावेद काझी, शीतल कुरटकर, ओंकार चव्हाण, मोनिका निनावे, संगीता ठाकरे, रामदास बनकर, विरेंद्र चव्हाण, जयश्री हजारे, चंदा आत्राम, संजय मेश्राम, नर्मदा राठोड, विजू पोटे, सुजाता भगत, सुनंदा गोडबोले, रेखा सोनावणे, लक्ष्मी मोहोड, जिजाबाई वानखेडे, दुर्गा डडमल, वैशाली राऊत, दिपा हातगडे, प्रतीक्षा नेहारे, सुवर्णा आठवले, आफ्ररीन देशमुख, दुर्गा दवने, दिलीप राठोड, वनिता घोडसे, निता हातगडे, दुर्गा पेंदोर, रंज्जु धोटे, अनुसया सिडाम, मंदा मोरकर, ज्योती चाफले, पार्वती पत्रे, अनिता साखरकर, रविंद्र चिंचाळकर, विमला, इंदिरा आत्राम, ममता सामल, कुसुम जाधव, संगीता पडगवार यांच्यासह शेकडो महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Comments


bottom of page