top of page

राहुल गांधींचा पुन्हा एक धमाका, चक्क मृत मतदारांसोबत ‘चाय पे चर्चा’!

ree

नवी दिल्ली: काँग्रेस नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचा आरोप केल्याने देशाच्या राजकारणात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोग आरोपीच्या पिंजर्‍यात उभा आहे. आता तर त्यांनी आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आणंलं आहे. राहुल गांधी यांनी चक्क मृत मतदारांसोबत चहापान केल्याचे फोटो व्हायरल केले आहेत.


राहुल गांधी यांनी सोशल मिडियाच्या हँडलवर ट्विटद्वारे एकच खळबळ उडवून दिली आहे. राहुल गांधी यांनी मतदार यादीमध्ये ज्या मतदारांना मृत दाखवण्यात आलं होतं. त्यांच्यासोबत प्रत्यक्षात चहा घेतला आहे. “ जीवनात अनेक प्रकारचे अनुभव येतात काही गोड, काही कडू, तर काही अगदी हसवणारे. पण मृत व्यक्तींसोबत बसून चहा पिण्याचा अनुभव? हे तर चित्रपटातील गोष्ट वाटते. मात्र हा प्रसंग घडला आहे. अगदी प्रत्यक्षात आणि त्याचं श्रेय जातं.. थेट निवडणूक आयोगाला’ असं म्हणत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला टोला लगावला आहे.


मतदार यादीतील गोंधळ आणि चुकीच्या नोंदींमुळे अनेक मृत व्यक्ती अजूनही ‘ जिवंत मतदार ’ म्हणून नोंदवले गेले होते. एका जनजागृती कार्यक्रमात, चहा- पानाचे आयोजन करण्यात आलं होतं. आणि उपस्थितांच्या यादीत हे मृत मतदार देखील नोंदवले गेले. आयोजकांनी यादीप्रमाणे निमंत्रण पाठवलं, आणि मग सुरू झाला हा आगळावेगळा किस्सा ‘ चहा पार्टी विथ घोस्ट गेस्ट्स’ असंही राहुल गांधींनी सांगितलं.


स्थानिक रहिवाशांनी हा प्रकार सोशल मिडियावर टाकताच तो व्हायरल झाला. लोकांनी निवडणूक आयोगावर नाराजी व्यक्त करताना हा प्रकार विनोदाच्या पद्धतीनेही मांडला. आता निवडणूक अयोगाने या गोंधळाची दखल घेत सुधारणा करण्याचे अश्वासन दिले आहे. पण तोपर्यंत, हा ‘ भूतिया चहा अनुभव’ लोकांच्या आठवणीत कायम राहणार, हे नक्की,” असा टोला ही राहुल गांधींनी लागावला.

Comments


bottom of page