राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब, निवडणूक आयोगाची मोठी कारवाई ; राजकीय पक्षांमध्ये खळबळ
- Navnath Yewale
- Sep 19
- 1 min read

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांच्यात आरोप- प्रत्यारोपांचे वार-पलटवार सुरू आहेत. नवी दिल्लीत आणखी एक पत्रकार परिषद घेत राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्तांवरचा आपला हल्ला सुरूच ठेवला आहे. याचदरम्यान, आता निवडणूक आयोगानं सर्वात मोठा निर्णय घेतला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेच्या 24 तासांतच केंद्रीय निवडणूक आयोगाने हे मोठं पाऊल उचलल्यानं खळबळ उडाली आहे. आयोगानं निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता जपण्याच्या उद्देशानं देशातील तब्बल 474 नांदणीकृत अमान्यप्राप्त राजकीय पक्षांना यादीतून वगळलं आहे. यात महाराष्ट्रातील 44 पक्षांचाही समावेश आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगानं देशातील सुमारे 474 राजकीय पक्षांना मोठा दणका दिला आहे. उत्तर प्रदेशातील सर्वाधिक 121 पक्षांसह दिल्ली-40, महाराष्ट्र -44, तामिळनाडू -42, बिहार-15, मध्यप्रदेश -23, पंजाब 21, राजस्थान 17 आणि हरियाणा 17 एवढ्या पक्षांचा समावेश आहे.
निवडणूक आयोगाची दोन महिन्यांतली ही दुसरी मोठी कारवाई आहे. दीड महिन्यात आयोगानं तब्बल 808 राजकीय पक्षांना या यादीतून हटवलं आहे. पहिल्या टप्प्यात 9 ऑगस्टला 334 तर दुसर्यांदा 18 सप्टेंबर रोजी 474 पक्षांना नोंदणीकृत अमान्यताप्राप्त पक्षांना यादीतून वगळण्यात आले आहे.
ज्या राजकीय पक्षांनी सलग सहा वर्षे कोणत्याही निवडणुकीत भाग घेतला नाही, अशांना निवडणूक आयोगानं आपल्या यादीतून हटवले आहे. ही कारवाई आयोगानं लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 29 अ अंतर्गत केल्योच समोर आले आहे.
दरम्यान, निवडणूक अयोगानं महाराष्ट्रामधील 44 पक्षांवरही कारवाई केली आहे. पण कारवाई करण्यात आलेल्या पक्षांची नावे अजून समोर आलेली नाहीत. यानंतर आता आयोगाकडून तिसर्या टप्प्यांत 359 पक्षांची यादी तयार केल्याचीही माहिती समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक अयोगानं तिसर्या टप्प्यांतील कारवाईशी संबंधित राज्ये अन् केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकार्यांना या पक्षांना नोटीस बजावण्यासंबंधीचे आदेश दिले आहेत. यात मागील तीन आर्थिक वर्षांचे वार्षिक लेखा आणि निवडणूक खर्चाचा अहवाल वेळेत सादर केलेले नाहीत.


Comments