top of page

राहुल गांधीच्या ‘छात्रो की गूँज’ आयोजित कार्यक्रमावर मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

मुंबई: “ ज्या विचारसरणीला काँग्रेसचे लोक आणि राहुल गांधी मानतात, त्याच विचारसरणीच्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमासाठी आणण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बोलावून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम आहे” असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.


काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुूल गांधी पुण्यात तरुण आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. “ छात्रो की गूँज” या नावाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राहुल गांधी तरुणांशी संवाद साधत आहेत, ही आनंदाची बाब आहे. मात्र, हा संवाद सरसकट सर्व विद्यार्थ्यांसाठी खुला असता तर अधिक आनंद झाला असता, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.


मुख्यमंत्री फडणवीस यांनी दावा केला की, “ माझ्याकडे जी माहिती आहे, त्यानुसार काँग्रेसच्या नेत्यांकडून संचलित महाविद्यालयांमधील विद्यार्थिनींची नोंदणी करून त्यांनाच या कार्यक्रमात आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, त्याही आपल्याच मुली आहेत आणि राहुल गांधी त्यांच्याशी संवाद साधत आहेत याचा आनंद आहे, ‘ छात्र संवाद’ असे राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाचे नाव देण्यात आले आहे. हा कार्यक्रम खुला ठेवला असता आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यामध्ये सहभागी होता आले असते, तर अधिक चांगले झाले असते. मात्र, पुणे आणि पुण्याच्या आसपास काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या किंवा नेत्यांच्या शिक्षण संस्था आहेत, त्या शिक्षण संस्थामधील मुला-मुलींनाच या कार्यक्रमासाठी बोलावण्यात आले आहे. काँग्रेसच्या शिक्षण संस्थामधील विद्यार्थ्यांनाच या कार्यक्रमात प्रवेश दिला जात असल्याने राहुल गांधी यांचा हा कार्यक्रम एका नियंत्रित वातावरणात होत आहे, असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला.

Comments


bottom of page