रोहित पवारांच्या मागणी यश, डिजीसीएची मोठी कारवाई; व्हिएसआर कंपनीच्या विमानांना भारतात उड्डाण बंदी
- Navnath Yewale
- 40 minutes ago
- 2 min read

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. पण हा अपघात की, घातपात याबद्दल वेगळाच संशय व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार आणि अजितदादांचे पुतणे रोहित पवार यांनी मुंबई आणि दिल्लीत पत्रकार परिषदा घेऊन विमान अपघाताबद्दल धक्कादायक माहिती आणि गंभीर आरेाप केले . त्यांनी मुख्य म्हणजे, त्या विमानाचा अपघात झाला, त्या विमानाच्या कंपनीवरही गंभीर आरोप केले होते. अखेरीस रोहित पवारांच्या या लढ्याला यश आलं आहे. व्हीएसआर कंपनीच्या उड्डाणावर देशभरात बंदी घालण्यात आली आहे.
अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचलनालय आर्थात डीजीसीए कडून पहिली कारवाई करण्यात आली आहे. डीजीसीए ने व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या विमान कंपनीच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. डीजीसीए या प्रकरणी ऑडिट केलं आहे. यामध्ये व्हीएसआर व्हेंचरच्या सर्व लिअरजेट विमानांच्या उड्डाणांवर आता बंदी आणली आहे. कंपनीच्या अनेक विमानांमध्ये त्रुटी आढळली आहे. यामध्ये व्हीटी-व्हीआरए, व्हीटी -व्हिआरएस, व्हीटी-व्हीआरव्ही आणि व्हीटी- टीआरआय या चार विमानांवर डीजीसीएने उड्डाणासह मनाई घातली आहे.
डिजीसीएच्या रिपोर्टमध्ये काय?: बारामती येथे 28 जानेवारी रेाजी झालेल्या मेसर्स व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या लिअरजेट 45 विमानाच्या (व्हीटी-एसएसके) अपघातानंतर, नागरी विमान वाहतूक महासंचलनालयाने संस्थेचे विशेष सुरक्षा औडिट करण्याचे आदेश दिले. बहु-ऑडिट टीमने संस्थेमध्ये हवाई योग्यता, हवाई सुरक्षा आणि उड्डाण ऑपरेशन्सच्या क्षेत्रात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत.
निरीक्षण केलेल्या गंभीर चुका तथा त्रुटी लक्षात घेता नोंदणीकृत लिअरजेट 40/45 विमानांना तात्काळ ग्राऊंडिंग करून सुधारणात्मक उपाययोजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डीजीसीएकडून पुढील मूल्यांकनासाठी गैर-अनुपालनांचे मूळ कारण विश्लेषण सादर करण्यासाठी वरील उल्लेखित क्षेत्रांमध्ये मेसर्स व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडला कमतरता अहवाल फॉर्म जारी करण्यात आले आहेत.
रोहित पवारांचे गंभीर आरोप : रोहित पवार यांनी मुंबई, दिल्लीमध्ये पत्रकार परिषदा घेऊन अजितदादांच्या विमानाचा अपघात नसून घातपात असल्याचा दावा केला होता. तसंच रोहित पवार यांनी व्हएसआर या विमान कंपनीवर अने आरोप केले होते. खास करुन या कंपनीला राजकीय संरक्षण दिले जात असल्याचा आरोपही केला होता. ज्या दिवशी अपघात घडला तेव्हा विमानाचा ट्रान्सपॉन्डर शेवटच्या काही मिनिटांत बंद झाला होता. या कंपनीने खर्च वाचवण्यासाठी विमानात बेकायदेशीररित्या जास्तीच्या इंधन टाक्या ठेवल्या होत्या, त्यामुळे अपघातानंतर मोठा स्फोट झा असा दावा त्यांनी केला होता.



Comments