top of page

लाडक्या बहिणींच्या खात्यात येत्या 2-3 दिवसांत फेब्रूवारीच्या हप्त्याची रक्कम

Mar 30
1 min read

महायुती सरकारच्या “ मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने ” अंतर्गत्र राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना दरमहा 1500 रुपये ची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत लाखो महिलांसाठी ही एक महत्वपूर्ण बातमी आहे. राज्य सरकारने “ मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने” अंतर्गत फेब्रूवारी सन्मान निधीचे वितरण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी “ एक्स” या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती दिली. पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात फेब्रूवारी महिन्याचा हप्ता जमा होण्याची तारीख ही सांगितली आहे.


मंत्री अदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मिडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, “ मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने” अंतर्गत्र फेब्रूवारी महिन्याच्या सन्मान निधीचे वितरण सुरू झाले आहे. या योनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना आजपासून त्यांचा फेब्रूवारी महिन्याचा सन्मान निधी मिळण्यास सुरूवात होईल” ही रक्कम पुढील 2-3 दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यांमध्ये जमा केली जाई”


महाराष्ट्रातील नगरपालिका निवडणुका आणि ई-केवायसी अद्यवतीकरण प्रक्रियेमुळ फेब्रूवारीचा हप्ता अद्याप महिलांच्या खात्यात पोहोचला नव्हता. अदिती तटकरे यांनी 27 मार्च रोजी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रूवारीचा हप्ता 30 आणि 31 मार्चपर्यंत सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात हस्तांतरीत केला जाईल.


बहिणींसाठी ई- केवायसी प्रक्रियेत एक त्रुटी होती, आणि त्यांना 31 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन पोर्टलद्वारे ती दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली आहे. महिला आणि बाल विकास मंत्र्यांनी 6 फेब्रूवारी रोजी या संबंधी एक पोस्ट शेअर केली. त्यांच्या मागील पोस्टमध्ये, मंत्री तटकरे यांनी म्हटले होते.


31 मार्च ई- केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा 2026 पर्यंत ऑनलाईन पोर्टलद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा, हे सुनिश्चित करणे महिला व बाल विकास विभागाचे प्रामाणिक प्रयत्न आहेत. त्यामुळे प्रिय भगिनींनो, ज्यांनी ई-केवायसी प्रक्रियेत काही चुका केल्या आहेत, त्यांना अंतिम मुदतीपूर्वी त्या दुरुस्त कण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.

Comments


bottom of page