लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकारपरिषदेत माहिती
- Navnath Yewale
- 4 hours ago
- 1 min read

नागपूर: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची सर्वात लोकप्रिय ठरलेल्या योजनांपैकी एक योजना आहे. या योजनेवरुन विधीमंडळात जोरदार घमासान होताना बघायला मिळात आहे. राज्य विधीमंडळाचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेच्या मुद्यावरुन विरोधकांकडून सरकारवर निशाणा साला जात आहे. राज्य सरकारने लाडक्या बहीणींना 2100 रुपये आर्थिक मदत देण्याचं अश्वसान विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलं होतं. पण अद्याप तशी घोषणा झालेली नाही. त्यामुळे या मुद्यावरून विरोधकांकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे. विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत प्रत्यूत्तर दिलं आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, “ लाडक्या बहीणींनी विधानसभेच्या निवडणुकी विरोधकांना घरी बसवलं आहे. त्यामुळे आम्ही जी लाडकी बहीण योजना सुरू केली ती कधीही बंद होणार नाही. आम्ही जे बोललो, दर महिन्याला लाडक्या बहीणींना 2100 रुपयांची आर्थिक मदत देण्याबाबतचा निर्णयही आम्ही घेऊ. ते अश्वासनही आम्ही पूर्ण करू. असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
पुढे बोलतांना शिंदे म्हणाले “ लाडकी बहीण योजना जेव्हा आम्ही सुरु करत होतो तेव्हा हेच लोकं ही योजना बंद पडावी यासाठी कोर्टात गेले होते. याच लोकांनी नागपूरच्या कोर्टात धाव घेतली होती. ते महाविकास आघाडीचेच लोकं होती. पण आम्ही लाडकी बहीण योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. ही योजना कायम सुरू राहणार हेही मी सांगतो. आम्ही जे 2100 रुपये बोललो आहोत, योग्यवेळी आम्ही त्यांची पूर्तता करणार” असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.



Comments