top of page

लातूरमध्ये काँग्रेसच्या झेडपी महिला उमेदवार पतीसह गायब! हळदी कुंकवला गेल्या, पण परतल्याच नाहीत; काँग्रेस पदाधिकार्‍यांचा भाजपवर अपहरणाचा आरोप

लातूर: जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर लातूर जिल्ह्यात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या अवघ्या एक दिवस आधी काँग्रेस पक्षाच्या महिला उमेदवारोच अपहरण झाल्याच गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. औसा विधानसभा मतदारासंघाच्या निलंगा तालुक्यातील उनसूचित जमाती प्रवर्गाती प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या तांबाळा जिल्हा परिषद सर्कलमधील काँग्रेसच्या उमेदवार अंजना सुनील चौधरी यांचे 24 जानेवारी रोजी अपहरण झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.


दरम्यान, 24 जानेवारी रोजी सायंकाळी अंजना सुनील चौधरी यांचं उदगीर येथून अपहरण झाल्याचा दाव काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी लातूरचे पोलिस अधीक्षक यांच्यामार्फत मुख्यमंत्र्याकडे निवेदनही दिले आहे.

अपहरण प्रकरणी माध्यमांशी बोलताना साळुंके म्हणाले की, सत्ताधारी भाजप आमदारांच्या गुंडांकडून हे अपहरण करण्यात आले असून लोकशाही मार्गाने निवडणूक न लढता दहशतीचे राजकारण सुरू आहे. निलंगा तालुक्यातील तांबाळा जिल्हा परिषद सर्कलमधील काँग्रेसच्या उमेदवार अंजना चौधरी या उदगीर येथील बिदर रोड परिसरात मैत्रिणीच्या घरी हळदी-कुंकू कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर प्रचारासाठी जाण्याचे ठरले होते. मात्र त्याआधीच काही अज्ञात व्यक्तींनी त्यांना जबरदस्तीने वाहनात बसवून पळवून नेल्याचा आरोप त्यांनी केला. स्थानिक काँग्रेसचे नेते रणजीत कोकणे, पक्षाचे कार्यकर्ते आणि उमेदवाराचे कुटुंबीय यांनी शोध घेतला असता त्या सापडल्या नसल्याचा दावा ही काँग्रेसकडून करण्यात आला आहे.


या प्रकरणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव यांनी पोलिस अधीक्षकांमार्फत मुख्यमंत्रभ तथा गृहमंत्री यांना निवेदन दिले आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन अपह्रत उमेदवाराचा तात्काळ शोध लावण्याची मागणी केली आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी पात्र उमेदवार मिळणे आधीच अवघड असताना अशा प्रकारे उमेदवाराचे अपहरण करणे हा लोकशाहीवर हल्ला असल्याचे काँग्रेस पदाधिकारी म्हणाले. अंजना चौधरी यांचे पतीही घरी आढळून न आल्याने त्यांचाही अपहरणात समावेश असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे लातूर जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पोलीस प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments


bottom of page