लोकांना कर्जमाफिचा नाद, वादग्रस्त वक्तव्यांनंतर टीकेची झोड सहाकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचा माफिनाम ; कोणाच्या भावना दुखवण्याचा हेतू नव्हाता!
- Navnath Yewale
- Oct 10
- 1 min read

मुंबई: लोकांना कर्ज माफीचा नाद लागला आहे. आम्हाला निवडून यायचे असते, म्हणून काहीतरी अश्वासने निवडणुकीच्या वेळी देत असतो. पण, काय मागायचे ते लोकांनी ठरवले पाहिजे, असे वादग्रस्त वक्तव्य सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. या असंवेदनशील विधानावर टीकेची झोड उठल्यानंतर सारवासारव करी मंत्रीपाटील यांनी माफी मागगितली.
जळगावमधील एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य करून बाबासाहेब पाटील यांनी शेतकर्यांचा रोष ओढावून घेतला आहे. वादग्रस्त विधानांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवा) गटाचे मंत्री माणिकरावा कोकाटे अडचणीत आल्यानंतरही वादग्रस्त विधानांची माहिला सुरूच आहे.
लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे. आम्हाला निवडून यायचे असते, म्हणून काहीतरी आश्वासने निवडणुकीच्या वेळी देत असतो. निवडणुकीच्या काळात समजा कोणी गावात नदी आणून द्या, अशी मागणी केली तर निवडून यायचे असल्याने नदी आणून देऊ असेही आश्वासन दिले जाते. त्यामुळे काय मागायचे, हे लोकांनी ठरवले पाहिजे, असे पाटील म्हणाले. त्यांच्या या विधानावर सर्वस्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर पाटील यांनी सारवासारव करीत माफी मागितली आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, असेही त्यांनी म्हटले आहे.
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीवर केलेले विधान ही शेतकर्यांची क्रुर थट्टा करणारे आहे. शेतकर्यांबद्दल बेताल वक्तव्य करणार्या मंत्री पाटील यांची मंत्रिमंडळातून त्काळ हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. तर पाटील यांचे विधान संतापजनक आहे. शेतकर्यांच्या जखमांवर मीठ चोळणारे आहे. अगोदरच अतिवृष्टीने शेतकरी हैरान आहेत. त्यात अतिवृष्टी मदतीत अटी शर्थी टाकल्यामुळे व अनेक जिल्हे, गावं वगळल्यामुळे शेतकर्यांच्या मनात राग खदखदतोय आहे. अशा पार्श्वभूमिवर शेतकर्यांना डिवचणारी विधानं केली जात आहेत. असे किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी म्हटले आहे.


Comments